'धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करा'; उच्च न्यायालयात जनहित याचिका

'धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करा'; उच्च न्यायालयात जनहित याचिका

मुंबई  : लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादी कौग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी जनहित याचिका थेट मुंबई उच्च न्यायालयात आज करण्यात आली.

मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतः बद्दल ची माहिती दडवून ठेवली. त्यांना आणखी दोन मुले असून ही माहिती त्यांनी दाखल केली नाही असा दावा याचिकेत केला आहे. पुण्यातील राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही याचिका केली आहे. 

मुंडे यांनी करुणा शर्मा या महिलेशी कथित संबंध ठेवले आणि त्यापासून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत, अशी कबुली दिली आहे. याची माहितीदेखील त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली आहे. मात्र निवडणूक आयोगापुढे फौर्म 26 मध्ये केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती सांगितली नाही, असे याचिकेत म्हटले आहे. मुंडे सन 2003 पासून या संबंधामध्रये आहेत. पण सन 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांनी ही माहिती लपविली आणि केवळ दोन मुली आहेत असे सांगितले. त्यामुळे निवडणूक आयोगापुढे खोटी आणि अर्धवट माहिती देऊन सत्य दडवून ठेवल्या प्रकरणी कलम 420 आणि 125 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. याचिकेवर नियमित न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

File a case against Dhananjay Munde Filed a public interest litigation in the High Court

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com