बलात्कार पीडितेची पोलीस तक्रार दाखल करण्यासाठी फरफट नको; विशेष न्यायालयाकडून पोलिस विभागाची कानउघाडणी

सुनिता महामुणकर
Saturday, 23 January 2021

बलात्कार पीडितेला तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्याची फरफट करायला लावू नका, असे विशेष न्यायालयाने पोलीस विभागाला सुनावले आहे.

 

मुंबई  : बलात्कार पीडितेला तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्याची फरफट करायला लावू नका, असे विशेष न्यायालयाने पोलीस विभागाला सुनावले आहे. पाच वर्षांच्या मुलीवरील बलात्काराची फिर्याद दाखल करण्यासाठी तिच्या पालकांना तीन पोलीस ठाण्यात फिरावे लागले होते. पीडितेच्या पालकांना प्रथम एमआयडीसी पोलीस, आरे आणि सहारा पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी धावपळ करावी लागली होती. आरोपीच्या वतीने हा मुद्दा खटल्यामध्ये उपस्थित करण्यात आला होता. न्यायालयाने याची दखल घेतली होती. बलात्कार प्रकरणात पीडितेची पोलीस ठाण्यात फरफट करण्याऐवजी त्यांना प्रथम घरी वा रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी न्यावे, असा सल्ला न्यायालयाने दिला आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

तीन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेत पीडित लहान मुलीचे अपहरण करण्यात आले होते. आरेच्या जंगलात तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. तिचे घर सहार पोलीस ठाण्यात येत असून आरे जंगल आरे पोलीस ठाण्यात आहे. तिला खूप जखमा आणि दुखापत झाली होती. एका पोलिसाला ती सापडली तेव्हा त्यांनी तिला एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. गुन्हा आरे क्षेत्रात घडल्यामुळे तिला आरे पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिच्या पालकांनी सहार पोलीस ठाण्यात ती हरविल्याची तक्रार केली होती. मात्र त्यांना आरे पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. तिथे तक्रार दाखल करुन ती सहारमध्ये वर्ग करण्यात आली. 
न्यायालयाने आरोपीचा हद्दीचा मुद्दा अमान्य केला. मुलीने दिलेला जबाब, सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य घटनास्थळी पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले आणि आरोपीला (34) पौस्को आणि भादंवि कलमांखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

file a police report of a rape victim Immediately by Special Court mumbai news

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: file a police report of a rape victim Immediately by Special Court mumbai news