मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट खटल्या प्रकरणाचा अंतिम निकाल ३१ जुलैला देणार असल्याचे विशेष न्यायालयाने सांगितले. या खटल्यासंबंधी कागदपत्रे आणि निकालाचे विस्तृत वाचन करण्यास वेळ लागणार असल्याचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी सांगितले. .सुमारे १७ वर्षे चाललेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी १९ एप्रिलला पूर्ण झाली होती. विशेष न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. न्यायालयाने मालेगाव खटल्यात दोषी आढळलेल्या सर्व व्यक्ती, आरोपींना ३१ जुलैला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे..२९ सप्टेंबर २००८ मध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील मशिदीजवळ उभ्या असलेल्या एका मोटारसायकलमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या भीषण स्फोटात सहा जण मृत्युमुखी तर १०० जण जखमी झाले होते. या खटल्यात ३२३ साक्षीदारांची साक्ष झाली. त्यातील ३४ साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली..लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहीत, भाजप नेत्या प्रज्ञा ठाकूर, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी या आरोपींविरोधात ‘यूएपीए’ तसेच ‘आयपीसी’ कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.