सायबर अटॅकमुळे आयडॉलच्या परीक्षेचा गोंधळ, पेपर पुढे ढकलले

तेजस वाघमारे
Wednesday, 7 October 2020

मुंबई विद्यापीठाच्या दूर व  मुक्त अध्ययन संस्थेच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीएच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर अटॅक झाला आहे. यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने मंगळवारी आणि बुधवारी म्हणजेच आज होणारे परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्यात आलेत.

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या दूर व  मुक्त अध्ययन संस्थेच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीएच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर अटॅक झाला आहे. यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने मंगळवारी आणि बुधवारी म्हणजेच आज होणारे परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्यात आलेत. या परीक्षेच्या तारखा लवकरच ठरवून त्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आणि आयडॉलच्या लिंकवर प्रदर्शित केल्या जाणारेत. ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर अटॅक आढळला आहे. त्यादृष्टीने विद्यापीठ तक्रार नोंदविणार आहे. यामुळे या परीक्षांमध्ये ही तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.

दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या अंतिम वर्षाच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीएच्या परीक्षेस 3 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. मंगळवारी या परीक्षेचा दुसरा पेपर होता. तांत्रिक अडचणीमुळे आजचे हे  पेपर पुढे ढकलण्यात आलेत. तसेच बुधवार 7 ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षा तृतीय वर्ष बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स, तृतीय वर्ष बीएस्सी आयटी सत्र 6 आणि बॅकलॉगच्या परीक्षा प्रथम आणि द्वितीय वर्ष बीए आणि बीकॉम, एमसीए सत्र 1 आणि सत्र 2 या परीक्षाचे पेपर पुढे ढकलण्यात आलेत.

6 आणि 7 ऑक्टोबरच्या परीक्षांच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे आयडॉलचे उपकुलसचिव आणि जनसंपर्क अधिकारी विनोद माळाळे यांनी सांगितले. 

-------------------

(संपादनः पूजा विचारे)

Final Year Exams 2020 MU IDOL issues new exam dates after cyber attack


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Final Year Exams 2020 MU IDOL issues new exam dates after cyber attack