esakal | बाळासाहेबांचा आशावाद! कोरोनानंतर आर्थिक संकट आणि उद्योगांसाठी संधीही
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेबांचा आशावाद! कोरोनानंतर आर्थिक संकट आणि उद्योगांसाठी संधीही

संपूर्ण जग कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावर आर्थिक संकटाला सामोरे जाणार आहे. परंतु, त्या संकटातही आपल्याला व्यापार-उद्योगासाठी कित्येक संधी मिळतील, असा आशावाद महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. 

बाळासाहेबांचा आशावाद! कोरोनानंतर आर्थिक संकट आणि उद्योगांसाठी संधीही

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : संपूर्ण जग कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावर आर्थिक संकटाला सामोरे जाणार आहे. परंतु, त्या संकटातही आपल्याला व्यापार-उद्योगासाठी कित्येक संधी मिळतील, असा आशावाद महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. 
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे आयोजित ई-परिसंवादात ते बोलत होते. सध्याच्या परिस्थितीत व्यापारी-उद्योजकांपुढील अडचणी सरकारसमोर मांडून तोडगा निघावा, या हेतूने असे ई-परिसंवाद घेतले जात आहेत. कोरोनानंतरच्या आर्थिक संकटातून मार्ग काढणे, नियोजन करणे व संधी शोधून कसे काम करता येईल, याबाबत विचारविनमय सुरू आहे

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या संपूर्ण जगात व्यापार, उद्योग, शेती पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यावर निर्यातीसाठी आपल्याला अनेक संधी मिळतील, असे थोरात म्हणाले. सरकार उद्योजक-व्यावसायिकांसोबत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. तुमच्या अडचणी वेगवेगळ्या विभागांशी संबंधित आहेत. सर्वांशी बोलून या अडचणी सोडवण्यासाठी पाठपुरावा करेन, असेही त्यांनी सांगितले. 
 

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चासत्रात राज्यातील सर्व विभागीय चेंबर्स आणि पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला होता. लॉकडाऊनमुळे व्यापार-उद्योग बंद असल्याने उत्पादन व उत्पन्न बंद आहे, मात्र खर्च सुरूच आहेत. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यावर व्यापारी, उद्योजकाना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल, असे मंडलेचा म्हणाले. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि व्यापारी व शेतकऱ्यांच्या अडचणींकडे थोरात यांचे लक्ष वेधण्यात आले.

 अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा
 

चर्चासत्रातील सूचना 
- सरकार, व्यापारी, उद्योजक, शेतकरी यांची समन्वय समिती स्थापन करावी. 
- उद्योगांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने विशेष पॅकेज जाहीर करावे. 
- व्यापारी, उद्योजक, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पोलिस व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठका घ्याव्यात.

loading image
go to top