Mumbai News: भिवंडीमध्ये डायपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; तीन मजली इमारत जळून खाक

Fire at Diaper Manufacturing Company: भिवंडीमध्ये डायपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. भिवंडीच्या सरवली एमआयडीसीमध्ये कंपनीला आग लागली.
bhiwandi fire
bhiwandi fire

मुंबई- भिवंडीमध्ये डायपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. भिवंडीच्या सरवली एमआयडीसीमध्ये कंपनीला आग लागली. यात तीन मजली इमारत पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी तीनच्या सुमारास सदाशिव हायजिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आग लागली. आगीचं कारण कळू शकलेलं नाही.

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. पण, तीन मजली इमारत जळून पू्र्ण खाक झालीये. ठाणे, कल्याण येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग भीषण असल्याने ती विझवण्यास वेळ लागत आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आग विझवण्यासाठी आणखी काही तास लागणार आहेत.

bhiwandi fire
Salman Khan house firing : सलमान खानला मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा! जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

अग्निशमनदलाच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सव्वा तीनच्या सुमारास इमारतीला आग लागली. सुरुवातीला पहिल्या मजल्याला आग लागली होती. त्यानंतर ती तिसऱ्या मजल्यापर्यंत पसरली. कंपनीमध्ये कागद, कपडा, प्लास्टिक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भीषण आग लागली आहे. पाणी नसल्याने अनेक अडथळे येत आहेत. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com