फायर ब्रिगेड श्वसन उपकरण वाहनांसाठी 10 कोटी खर्च करणार

Fire-Brigade
Fire-Brigadesakal media

मुंबई : आगीशी झुंजताना अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांची लाईफलाईन असलेल्या श्‍वसन उपकरणात (oxygen equipment) श्‍वसन वायू भरण्यासाठी तीन वाहने विकत घेण्यात येणार आहे. अग्निशमन दल यासाठी 10 कोटी रुपयांचा (10 Crore rupees) खर्च करणार असून या खरेदीला स्थायी समितीने मंजूरी दिली आहे. पाच वर्षांच्या देखभालीचा खर्चही यात समाविष्ठ आहे. (fire brigade gives 10 crore rs for oxygen vehicle equipment)

मोठी आग असल्यास ती विझवताना आगीच्या मुळा पर्यंत पाेहचणे गरजेचे आहे. आग बंदीस्त जागेत असल्यास प्राणावायू कमी असल्याने अग्निशमन दलाचे जवान श्‍वसन उपकरणाच्या हंड्या घेऊन बंदीस्त जागेत जातात.2015 मध्ये श्‍वसन वायू भरणारे श्‍वसन उपकरणे वाहने अग्निशमन दलाने 2015 मध्ये विकत घेतले होते.तर,वडाळा आणि विक्रोळी केंद्रात काँप्रेसर बसविण्यात आले आहे.हे काँप्रेसर 2009 मध्ये मध्ये बसविण्यात आले आहे.

Fire-Brigade
एसटी महामंडळाच्या नाकर्तेपणामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

मात्र,वारंवार घडणाऱ्या आगीच्या दुर्घटना तसेच सध्या अस्तीत्वात असलेली यंत्रणा जुनी झाल्याने अग्निशमन दलाने नवी वाहाने विकत घेण्याचा निर्णय घेतला होते.त्यानुसार 10 कोटी 21 लाख रुपयांना ही तीन वाहाने विकत घेण्यात येणार असून शहर,पुर्व आणि पश्‍चिम उपनगरात प्रत्येकी 1 या प्रमाणे ही वाहाने वितरीत करण्यात येणार आहे.यात सर्वाधिक खर्च जनरेटन आणि कंप्रोसरसाठी 7 कोटी 90 लाख रुपये खर्च होणार आहे.

जवानाच्या पाठीवर देण्यात येणाऱ्या श्‍वसन उपकरणाच्या हंडीमध्ये 45 मिटीने वापरता येईल इतका वायू साठवतो येता.त्यामुळे मोठी आग असल्यास या हंड्या वारंवार रिफील कराव्या लागतात.त्यासाठी या वाहानांचा वापर होणार आहे.

सुरक्षाही आणि वेगही

श्‍वसन हंडीमध्ये वायू उच्च दाबाला भरावा लागतो.अशावेळी स्फोट होण्याची शक्यता असते.त्यासाठी अमेरीकन कंपनीचे अत्याधुनिक कंप्रेसर घेण्यात येणार आहे.यामुळे अपघात होण्याची शक्यता कमी होईलच त्याच बरोबर श्‍वसन वायू भरण्याचाही वेगही वाढेल असा दावाही करण्यात आला आहे.

Fire-Brigade
सलमानच्या फार्महाऊस जवळील धबधब्यात बुडून तरूणाचा मृत्यू

अग्निशमन दलाची क्षमता काय

प्रादेशिक केंद्र - 6

अग्निशमन केंद्र - 35

लहान अग्निशमन केंद्र - 18

अग्निशमन दलासमोरील नवी आव्हाने

- भुयारी मेट्रो.

- सागरी किनारी मार्ग

-बेसमेंट (तळघर )असलेल्या इमारतींची वाढत असलेली संख्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com