डोंबिवली MIDC तील 'ड्रीमलॅंड' रासायनिक कंपनीला आग; मोठी वित्तहानी झाल्याचा अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवली MIDC तील 'ड्रीमलॅंड' रासायनिक कंपनीला आग; मोठी वित्तहानी झाल्याचा अंदाज

डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील ड्रीमलॅंड रासायनिक कंपनीला रविवारी दुपारी 12.30 च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली

डोंबिवली MIDC तील 'ड्रीमलॅंड' रासायनिक कंपनीला आग; मोठी वित्तहानी झाल्याचा अंदाज

ठाणे - डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील ड्रीमलॅंड रासायनिक कंपनीला रविवारी दुपारी 12.30 च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसून वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. 

सर्वात मोठी बातमी! राज्यात गणेशोत्सवानंतर ई-पास सक्ती रद्द? निर्बंध हटविण्यासाठी केंद्रिय गृहविभागाचे राज्याला पत्र

डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील रासायनिक कंपनीला आग लागण्याची महिन्याभरातील ही दुसरी घटना आहे. रक्षाबंधनच्या दिवशी याच परिसरातील एका कंपनीला आग लागून वित्तहानी झाली होती. त्यातच रविवारी 23 ऑगस्टला दुपारी साधारण 12.30 च्या सुमारास ड्रिमलॅंड या रासायनिक कंपनीला आग लागली. पावसाने आज उघडीप घेतली असून मध्येच उन पडत आहे. त्यामुळे आगीने रौद्र रुप धारण केले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

मुंबईतील मराठी चित्रपटांच्या हक्काचे 'सेंट्र्ल प्लाझा' होणार इतिहासजमा; आर्थिक संकटामुळे बंद करण्याचा निर्णय

सुरुवातीला घटनास्थळी तीन गाड्या दाखल झाल्या होत्या. नंतर पुन्हा दोन गाड्या मागविण्यात आल्या. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलास यश आले. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागली असावी असा प्रथम अंदाज बांधला जात आहे. या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसून वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top