वाशी स्थानकात लोकल पेंटाग्राफला आग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

ऐन गर्दीच्या वेळेत हार्बर मार्गावरील वाशी स्थानकात सीएसएमटी-पनवेल लोकलच्या पेंटाग्राफला आग लागली.

मुंबई : ऐन गर्दीच्या वेळेत हार्बर मार्गावरील वाशी स्थानकात  सीएसएमटी-पनवेल लोकलच्या पेंटाग्राफला आग लागली.

या आगीमुळे स्थानकातील प्रवाशांचा गोंधळ उडाला. 
 सीएसएमटी-पनवेल लोकल सकाळी 9.23 वाजता वाशी स्थानकात येताच पेंटाग्राफला आग लागली. त्यानंतर लोकल कारशेडमध्ये रवाना करण्यात आली .परिणामी पनवेल दिशेने जाणाऱ्या लाेकल उशिराने धावत आहेत. तसेच सकाळी ऐन गर्दीच्या वेळी  घटना घडल्यामुळे प्रवाशांनाही कार्यालयात पोहचण्यास विलंब झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire at the local pentograph in Vashi Station