esakal | ठाणे ः रेफ्रिजरेटरमध्ये आग; कुटुंब होरपळले
sakal

बोलून बातमी शोधा

re.jpg

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील इराणी चहाच्या शॉपमध्ये रेफ्रीजरेटर युनिटमध्ये आग लागल्याची घटना रविवारी घडली. 

ठाणे ः रेफ्रिजरेटरमध्ये आग; कुटुंब होरपळले

sakal_logo
By
दीपक शेलार

ठाणे ः ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील इराणी चहाच्या शॉपमध्ये रेफ्रीजरेटर युनिटमध्ये अचानक आग लागल्याची घटना रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. हे चहा शॉप बाबू लंबोरे यांच्या मालकीचा आहे. या आगीत संतोष चव्हाण (39) व सुर्मला चव्हाण (32) या पती -पत्नीसह त्यांचा मुलगा तन्मय (13) हे किरकोळ होरपळले. सुदैवाने हे कुटुंब वेळीच घराबाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, घटनास्थळी ठाणे मनपा अग्निशमन दलाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. अशी माहिती ठाणे महापालिकेचे आपत्कालीन कक्ष प्रमुख संतोष कदम यांनी दिली.

loading image
go to top