सीवूडस्‌ येथे इमारतीला आग

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 February 2020

अग्निशमन दलाचे 7 जवान जखमी

नवी मुंबई : सीवूडस्‌, सेक्‍टर ४४ ए येथील सी होम्स या २१ मजली इमारतीच्या २० व्या व २१ व्या मजल्यावर शनिवारी आग लागली. ही आग विझवताना अग्निशमन दलाचे ७ जवान जखमी झाले. या आगीत इमारतीच्या दोन्ही मजल्यावरील घरातील सामानाचे नुकसान झाले.

काय म्हणताहेत फडणवीस? वाचा : महाराष्ट्रात पुन्हा भाजपचं सरकार आल्याशिवाय मी दिल्लीत जाणार नाही - फडणवीस

सी होम्स या इमारतीच्या २० व्या मजल्यावरील चंद्रकांत भन्साळी यांच्या ड्युप्लेक्‍स घरामध्ये सकाळी सातच्या सुमारास आग लागली. आगीने उग्ररूप धारण केल्याने इमारतीच्या २१ व्या मजल्यावरही आग लागली. घटनेची माहिती मिळताच नेरूळ अग्निशमन दलाच्या केंद्रातून तीन, सीबीडीतून एक, वाशीतून दोन, कोपरखैरणेतून एक, ऐरोली येथून एक अग्निशमन वाहने आणि एक ब्रॅंटो स्कायलिफ्ट घटनास्थळी दाखल झाली. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर साडेदहाच्या सुमारास आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळाले.

हेही वाचा ः शरद पवार यांचा माजी शिक्षण मंत्र्यांना टोला, म्हणालेत...

आग आटोक्‍यात आणताना केंद्र अधिकारी व्ही. डी. कोळी, सहायक केंद्र अधिकारी जी. बी. गाडे, एस. एम. जोशी, बी. एन. जावळे, एच. बी. भोये, एम. टी. पवार, पी. ए. ठाकरे असे अग्निशमन दलाचे सात जवान जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती, नेरूळ अग्निशमन केंद्राकडून देण्यात आली. 

शॉर्टसर्किटमुळे आग
रहिवासी जय शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेसहाच्या सुमारास भन्साळी यांच्या २० व्या मजल्यावरील घरामध्ये शॉर्ट सर्किट झाले. त्या वेळी त्यांनी घरात असलेल्या फायर एक्‍स्टिंगविशरच्या सहायाने आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र आग विझवण्यात ते अपयशी ठरले. काही क्षणातच पडद्यांनी पेट घेतला व आग घरभर पसरली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire at at Seawoods; Two firefighters injured