फर्स्ट क्लासचा पास एसी लोकलच्या पासमध्ये होणार रूपांतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Local

रेल्वे मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी साध्या लोकलच्या प्रथम श्रेणीचा मासिक पास एसी लोकलच्या मासिक पासमध्ये रूपांतरीत करण्याचा निर्णय घेतला.

फर्स्ट क्लासचा पास एसी लोकलच्या पासमध्ये होणार रूपांतर

मुंबई - रेल्वे मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी साध्या लोकलच्या प्रथम श्रेणीचा मासिक पास एसी लोकलच्या मासिक पासमध्ये रूपांतरीत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शनिवारपासून (ता. २४) या निर्णयाची अंमलबजावणी मध्य रेल्वेकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे आता साध्या लोकलमधील प्रथम श्रेणीतील प्रवास करणाऱ्या मासिक पासधारकांना आपले पास एसी लोकलचा पासमध्ये रूपांतरित करता येणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार,साध्या लोकलमधील प्रथम श्रेणीचा पासधारकांना आता आपले प्रथमश्रेणीचे पास एसी लोकलचा पासमध्ये रूपांतरित करण्याची सुविधा शनिवारपासून (२४सप्टेंबर) सुरु करत आहे. ही सुविधा फक्त प्रथम श्रेणीचा त्रैमासिक, सहामाही आणि वार्षीक पासधारकांसाठी असणार आहे. प्रथम श्रेणीच्या पासधारकांना एसी लोकलचा पास रूपांतरी करण्यासाठी पासदरातील फरक भरून नवीन पास तिकीट खिडक्या वर काढता येणार आहे.

रेल्वे मंत्रालयाचा निर्णयानंतर प्रथम श्रेणीचा पास असणाऱ्या प्रवाशांना एसी लोकल मधून प्रवास करता यावा यासाठी सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मशन सिस्टिम (क्रिस) कडून चाचणी करण्यात येत होती. ती चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता या सुविधेची अंमलबजावणी करण्यात येणार आहेत.

दिवसभरात ५६ फेऱ्या -

सध्या मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या दिवसभरात ५६ फेऱ्या तर पश्चिम रेल्वेवर दररोज ४८ फेऱ्या चालविण्यात येतात. या गाडयांना प्रवाश्याचा चांगला प्रतिसाद आहे.

असे करा पास रूपांतर -

साध्या लोकलमधील प्रथम श्रेणीतील मासिक पासधारक एसी लोकलचा पास काढण्यासाठी गेल्यास त्याला फरकाचे पैसे भरावे लागणार आहेत. त्यानंतर हा पास एसी लोकलचा पासमध्ये रूपांतरित होणार आहे.

हार्बरवासिय वंचित -

हार्बर मार्गावर एकही एसी लोकल नसल्याने हार्बर मार्गावरील प्रथम श्रेणीतून प्रवास करणाऱ्या पासधारकांना या सुविधेचा कसलाही फायदा होणार नाही. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयावर हार्बर वासियांनी नाराजी व्यक्त केलेली आहे.

Web Title: First Class Pass Converted Into Ac Local Pass

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :passMumbai Local Train