esakal | मुंबईत म्युकर मायकोसिसमुळे पहिला मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

mucor-mycosis

मुंबईत म्युकर मायकोसिसमुळे पहिला मृत्यू

sakal_logo
By
समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई: म्युकर मायकोसिसमुळे (mukar mycosis) मुंबईत पहिला मृत्यू झाला आहे. केईएम रुग्णालयात (kem hospital) 36 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून आता पर्यंत सहा जणांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. महानगर पालिकेकडून (BMC) या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. केईएम रुग्णालयात या आजाराच्या 60 जणांवर उपचार सुरु आहेत. त्याच बरोबर नायर, शीव, कूपर रुग्णालयातही उपचार सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (First death of mukar mycosis in mumbai reported from kem hospital)

कोविड उपचारा दरम्यान स्टिरॉइड,टोसिलीझुमॅबचा अतिरीक्त वापरामुळे डोळ्यांमध्ये काळी बुरशी येते. म्युकर मायकोसिसवर वेळीच उपचार न झाल्यास जिवावरही बेतू शकते. डोळे,नाक यातून ही बुरशी मेंदू पर्यंत पोहचते. प्रतिकार शक्ती कमी असणार्‍यांसह कॅन्सर, किडनी, डायबेटिस, बोन मॅरो डिप्रेशन, थॅलेसेमिया असे आजार असणार्‍यांना या आजाराचा धोका जास्त असतो.

प्रसंगी ऑपरेशन करावे लागते. या आजाराचे रुग्ण वाढत असून सध्या 150 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.पालिकने यासाठी स्पेशल म्युकर मायकोसिस वॉर्ड आणि ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात येणार आहे. डोळ्यात इन्फेक्शन वाढल्यास डोळे गमावण्याची वेळ येते. पालिकेच्या केईएम रुग्णालयात आतापर्यंत सहा जणांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून इन्फेक्शन काढून टाकण्यात आले आहे.