esakal | कर्नाळा पक्षी अभयारण्यात पहिल्यांदाच शास्त्रीय पद्धतीने पक्षांची गणना
sakal

बोलून बातमी शोधा

कर्नाळा पक्षी अभयारण्यात पहिल्यांदाच शास्त्रीय पद्धतीने पक्षांची गणना

कर्नाळा पक्षी अभयारण्यात पहिल्यांदाच शास्त्रोक्त पद्धतीने पक्षी गणना करण्यात आली असून अभयारण्य परिसरात 103 प्रजाती चे पक्षी असल्याची नोंद 19 व 20 डिसेंबर या दोन दिवसाच्या कालावधीत करण्यात आली आहे.

कर्नाळा पक्षी अभयारण्यात पहिल्यांदाच शास्त्रीय पद्धतीने पक्षांची गणना

sakal_logo
By
दीपक घरत

पनवेल - कर्नाळा पक्षी अभयारण्यात पहिल्यांदाच शास्त्रोक्त पद्धतीने पक्षी गणना करण्यात आली असून अभयारण्य परिसरात 103 प्रजाती चे पक्षी असल्याची नोंद 19 व 20 डिसेंबर या दोन दिवसाच्या कालावधीत करण्यात आली आहे. पक्ष्यांचे नंदनवन म्हणून ओळख असलेल्या कर्नाळा पक्षी अभय अरण्यात नक्की किती प्रजातीचे पक्षी आहेत यांची नोंद आता पर्यंत करण्यात आलेली नसल्याने या पूर्वी अंदाजानेच पक्षी प्रजातींची आकडेवारी सांगितली जात होती.नव्या पद्धतीने करण्यात आलेल्या गणने मुळे अभय अरण्यात असलेल्या पक्षांचा निश्चित आकडा समजणार असला तरी हा आकडा निश्चित करण्यासाठी पुढील 3 ते 4 वर्ष सलग तिन्ही ऋतू मध्ये अभय अरण्यात कायम स्वरूपी राहणारे व विविध ऋतूंमध्ये स्थलांतरित होऊन येणाऱ्या पक्षांचा अभ्यास पक्षी निरीक्षक तसेच वन अधिकर्त्यांमार्फत केला जाणार असल्याची माहिती कर्नाळा पक्षी अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली आहे.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

अशी करण्यात आली गणना 
कर्नाळा पक्षी गणना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ग्रीन वर्क ट्रस्ट या संस्थेमार्फत पक्षीप्रेमी व पक्षी अभ्यासक यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने ४० तज्ञ व्यक्तींनी आपला सहभाग नोंदविला.या कार्यक्रमास अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव पश्चिम महाराष्ट्र बोरवली चे सुनील लिमये,भानुदास पिंगळे
(उपवनसंरक्षक वनविभाग ठाणे) नंदकुमार कुप्ते(सहा. वनसंरक्षक वन्यजीव फणसाड ) प्रदीप चव्हाण(वनपरिक्षेत्र अधिकारी कर्नाळा पक्षी अभयारण्य)तसेच वनपरिक्षेत्र कर्नाळा पक्षी अभयारण्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.19 डिसेंबर या दिवशी अभयारण्यातील भारद्वाज वन विश्रामगृहात  कार्यक्रमात सहभागी झालेले तज्ञ लोकांचे कर्नाळा पक्षी अभयारण्य तर्फे स्वागत करण्यात आले.या प्रसंगी ग्रीन वर्क ट्रस्टचे अध्यक्ष निखिल भोपळे यांनी शास्त्रीय पद्धतीने पक्षी गणना कशी करण्यात येणार याबाबत मार्गदर्शन केले.

ऐरोली नाका येथील भुयारी मार्गचा तिढा सुटणार, लवकरच काम मार्गी लागणार

कर्नाळा पक्षी अभयारण्यात एकूण 9 line transits तयार करण्यात आले होते. तसेच पक्षी गणनेत सहभागी झालेले तज्ञ लोकांचे नऊ ग्रुप करण्यात आले यात प्रामुख्याने एक वनविभागाचे कर्मचारी व ग्रीन वर्क ट्रस्ट या संस्थेचा सदस्य यांचा समावेश होता. प्रत्येक line transits हे 500 मिटर अंतराचे होते. अशा प्रत्येक 9  line transits परिसरा मध्ये पक्षी निरीक्षण हे डाव्या-उजव्या तसेच समोरील बाजूस 20 मिटर पर्यंत दिसणाऱ्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली.तसेच सदर पक्षी गणनेत पक्ष्यांची नोंदी या E- bird  या एप्लीकेशन द्वारे जगभरातील लोकांना दिसून येणार आहे.त्या मुळे 19 डिसेंबर रोजी रात्री 7 ते 8 या दरम्यान अभयारण्यातील एकूण 9 line transits फिरून  निशाचर पक्ष्यांचा आवाजाने त्यांच्या नोंदी घेण्यात आल्या.तर 20 डिसेंबर सकाळी 8ते 9 यादरम्यान एकूण 9 line transits पक्षी निरीक्षण करून दिसणाऱ्या पक्षांची नोंद करण्यात आली. दुपारच्या सत्रात सर्व अहवाल   तयार करण्यात आले, एकूण 9 ग्रुप यांनी घेतलेल्या नोंदी व छायाचित्र एकत्रित करण्यात आले. जवळपास 103 प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद या द्वारे करण्यात आला.

भानुदास पिंगळे उपवनसंरक्षक वन्यजीव विभाग ठाणे यांच्या हस्ते सहभागी झालेल्या प्रत्येकास वन विभागातर्फे व ग्रीन वर्क ट्रस्ट  यांचे तर्फे प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी वन परिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे व सहभागी झालेल्या पक्ष निरीक्षक छायाचित्रकार पक्षी अभ्यासक सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

For the first time in Karnala Bird Sanctuary birds are counted in a scientific manner

------------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image