आपला अभ्यास चुकीचा असल्याची लॅन्सेटची कबुली, १९७ वर्षात पहिल्यांदा मागे घेतला 'हा' अभ्यास...

आपला अभ्यास चुकीचा असल्याची लॅन्सेटची कबुली, १९७ वर्षात पहिल्यांदा मागे घेतला 'हा' अभ्यास...

मुंबई - जगभरात कोरोनावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरु आहे. कोरोना नक्की काय आहे, व्हायरस की बॅक्टेरिया इथपासून ते अगदी दाढी असलेल्या लोकांना किंवा टक्कल असलेल्या लोकांना कोरोनाची जास्त लागण होऊ शकते का इथवर संशोधनं सुरु आहे. या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाचं संशोधन म्हणजे कोरोनावर औषध किंवा कोरोनाची लस शोधणे.

यावर सर्वात आधी जगाचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे क्लोराक्वीन किंवा हायड्रॉक्सीक्लोरिक्विन या औषधाने. भारतात या औषधाची सर्वाधिक निर्मिती होते आणि भारतात या औषधाचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याने इथे भारतात या औषधावर चर्चा सुरु झाली. अमेरिकेने भारताकडून हे औषध मागवलं, भारतानेही हे औषध तातडीने अमेरिकेला पाठवून दिलं. 

मात्र, या औषधाने कोरोनाने होणाऱ्या मृत्युदरात वाढ होत असल्याचं कारण देत WHO कडून हे औषध वापरू नका असं सांगण्यात आलं. प्रसिद्ध अशा लॅन्सेट या मासिकात देखील औषधाविरोधात माहिती छापून आली होती. मात्र १९७ वर्षात पहिल्यांदाच एक मोठी घटना यंदा समोर आलीये.

आपला अभ्यास अहवाल चुकीचा असल्याचं म्हणत लॅन्सेट मासिकाने क्लोराक्वीन किंवा हायड्रॉक्सीक्लोरिक्विन बाबतचा जाहीर केलेला अहवाल आता मागे घेतलाय.

22 मे रोजी लॅन्सेटमध्ये प्रकाशित अहवालात 6 खंडांतील विविध रुग्णालयांमध्ये दाखल असणाऱ्या ९१ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांच्या डेटाचे विश्लेषण केलं होतं. क्लोराक्वीन किंवा हायड्रॉक्सीक्लोरिक्विनच्या वापरामुळे मृत्यूचे प्रमाण वाढलं आणि रुग्णांच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये बदल झाल्याचे आढळून आल्याचे नमूद करण्यात आले होते.

मात्र यावर १०० पेक्षा अधिक वैज्ञानिक आणि संशोधकांनी आक्षेप घेतला होता. या आक्षेपानंतर आता हा अभ्यास मागे घेण्यात आला असून याविषयी अभ्यास करण्यासाठीदुसरा अभ्यासगट नेमण्यात आलाय. 

या अहवालातील निष्कर्षानंतर क्लोराक्वीन किंवा हायड्रॉक्सीक्लोरिक्विनच्या उपचारामुळे मदत तर होत नाही या उलट रूग्णांचे हृदयाचे ठोके अनियमित होऊन मत्यू होतो अशी माहिती समोर आलेली. त्यानंतर WHO ने देखील कोरोना रुग्णांवर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा वापर करु नये अशा सूचना दिल्या होत्या यावर ICMR ने हे औषध धोकादायक नसल्याचं WHO ला सांगितलं होतं. 

यावर १०० पेक्षा अधिक वैज्ञानिक आणि संशोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर आता १९७ वर्षात प्रथमच लॅन्सेटने आपला अभ्यास मागे घेतलाय. 

first time in last 197 years lancet take backs its research on hydroxychloroquine

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com