समुद्रात सोडले प्रदूषित पाणी... मच्छीमारांसह शेतीचे मोठे नुकसान, ७० दिवस उलटूनही नुकसान भरपाई नाही

fishing  mumbai
fishing mumbaisakal

Uran: परिसरातील ओएनजीसीतून सोडल्या जाणाऱ्या घातक रसायनांमुळे समुद्राचे पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे मच्छीमारांसह शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या प्रकाराला ७० दिवस उलटूनही अजूनही प्रकल्पबाधीत नुकसान भरपाई पासून वंचित आहेत.

त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी बेमुदत उपोषणाचा इशारा ओएनजीसी प्रशासनाला दिला आहे. उरण येथील ओएनजीसी प्रकल्पातून ८ सप्टेंबरला मोठ्या प्रमाणात तेल गळती झाली होती. या तेल गळतीमुळे नागाव, केगाव, दांडा, खारखंड व करंजा या गावाजवळील मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते.

fishing  mumbai
Mumbai News : लाचखोरी प्रकरणात आरोपी आयआरएस अधिकारी समीर वानखेडेना अंतरिम दिलासा कायम

याबद्दल नुकसानभरपाई म्हणून आर्थिक मदत मिळणे तसेच ओएनजीसी प्रकल्पामधून होणाऱ्या तेल गळतीबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी ओएनजीसी प्रशासनाकडे केली होती.

मात्र, आजतागायत नुकसान भरपाई संदर्भात कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नसल्याने ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला जवळपास ७० दिवस उलटून गेले आहेत. मात्र, तरी देखील ओएनजीसी प्रशासन बाधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे

नाल्यावाटे रसायने समुद्रात उरण तालुक्यातील पिरवाड समुद्र किनारी असलेल्या ओएनजीसी कंपनीतून मोठ्या प्रमाणात क्रूड ऑईल नावाचे घातक रसायन सोडण्यात आले होते. या केमिकल युक्त तेलाने कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. शिवाय हे तेल गळती नाल्यावाटे शेतात, समुद्रात पसरल्याने शेतकरी तसेच मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे.

fishing  mumbai
Mumbai Local Train : लोकलमध्ये फेरीवाल्यांना परवानगी नको; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

ओएनजीसीच्या माध्यमातून शेतकरी व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी वेळोवेळी आवाज उठवला आहे. शासनाच्या प्रत्येक विभागात पत्रव्यवहार केला. मात्र, नुकसान भरपाई मिळत नसल्याने ओएनजीसीविरोधात बेमुदत उपोषण करणार आहे.
- वैभव कडू, सामाजिक कार्यकर्ते, उरण

fishing  mumbai
Mumbai News : ही कमान का हटेना? शहरातील सौंदर्यीकरण की विद्रुपीकरणास हातभार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com