esakal | रस्त्यावर पाणी साचलेल्या खड्डयांत "मासेमारी आंदोलन"; भिवंडी महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यावर पाणी साचलेल्या खड्डयांत "मासेमारी आंदोलन"; भिवंडी महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रयत्न

कामतघर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी नागरिकांना सोबत घेऊन वऱ्हाळादेवी परिसरातील कामतघर रस्त्यावर पडलेल्या पाणी साचलेल्या खड्डयात प्रतिकात्मक मासेमारी आंदोलन करून महापालिका प्रशासनाचा कारभाराचा निषेध केला आहे.

रस्त्यावर पाणी साचलेल्या खड्डयांत "मासेमारी आंदोलन"; भिवंडी महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रयत्न

sakal_logo
By
शरद वाघदळे

भिवंडी -  सार्वजनिक गणेशोत्सवास येत्या 22 आँगस्टपासून सुरवात होणार आहे. त्यामुळे महापालिकेने रस्त्यावरील खड्डे तातडीने भरून रस्ते दुरूस्त करावे अशी मागणी गणेश भक्तांनी भिवंडी महापालिकेच्या बांधकाम विभाग व पालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी खराब रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या कामतघर परिसरातील नागरीकांनी सामाजिक कार्यकर्ते विकास पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर खड्डयात साचलेल्या पाण्यात प्रतिकात्मक "मासेमारी आंदोलन" करून पालिका प्रशासनाचा गलथान कारभाराचा निषेध  करीत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

'कोरोना रिकव्हरी'त ठाणे शहराचा डंका; देशासह राज्यात किती क्रमांक पटकावला? वाचा सविस्तर

गेल्या सहा महिन्यांपुर्वी महानगरपालिकेचा बांधकाम विभागाच्यावतीने लाखो रुपये खर्च करून ठेकेदारा माफँत रस्ते दुरुस्त करून रस्त्यांंचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र पहिल्या पावसातच शहरातील विविध भागातील रस्ते वाहुन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डेे पडुन रस्ते खराब झाले आहेत. सर्वत्र रस्त्यावर खड्डे निर्माण होऊन वाहतूक कोंडी व किरकोळ अपघात होत आहेत.सार्वजनिक गणेशोत्सवापुर्वी रस्ते दुरुस्ती करण करण्यात यावे अशी मागणी गणेशोत्सव मंडळ व नागरिकांनी केली होती.
मात्र महापालिका बांधकाम प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने भिवंडी शहरातील कल्याण रोड,कामतघर, ताडाळी, पद्मानगर, बाजारपेठ, दरगाह रोड, शास्त्रीनगर  अशा विविध ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपलेला असताना शहरातील रस्त्यांवरील खड्डे भरण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरली आहे.त्यामुळे गणेश भक्तांमध्ये तीव्र नाराजी सुर उमटत असुन कामतघर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी नागरिकांना सोबत घेऊन वऱ्हाळादेवी परिसरातील कामतघर रस्त्यावर पडलेल्या पाणी साचलेल्या खड्डयात प्रतिकात्मक मासेमारी आंदोलन करून महापालिका प्रशासनाचा कारभाराचा निषेध केला आहे. आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी तातडीने गणेशोत्सव पुर्वी रस्ते दुरूस्ती करण करण्याचे आदेश बांधकाम विभागास दयावे तसेच खराब रस्ते बनविणाऱ्या ठेकेदार व खोटा अहवाल देणाऱ्या इंजिनिअर वर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

इरफानला कॅन्सर झाल्यावर सगळ्यात पहिले केली होती संजय दत्तने मदत - 

रस्त्यावर पडलेले खड्डे भरणे व रस्ते दुरुस्ती करण्याचे आदेश बांधकाम विभागास दिले आहेत. सतत पडत असलेल्या पावसामुळे कामात अडचणी निर्माण होत असुन रस्ते व्यवस्थित करण्याचे काम सुरू आहे.
डॉ. पंकज आशिया.आयुक्त. भिवंडी महापालिका

loading image
go to top