Lockdown : रायगडमध्ये पुन्हा सुरु होणार मासेमारी, मासळी स्वस्त होणार?

fishing
fishing

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील काही मच्छीमारांनी कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी मासेमारीला जाणे टाळले होते. मागील एक महिना बंदरात नांगर टाकून असलेल्या या मासेमारी नौका फेरा मारयला निघण्याची तयारी करत आहेत. मासेमारी पुन्हा सुरु होणार असल्याने मासळीचे दर काही प्रमाणात कमी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

मच्छी बाजारात गर्दी होत असल्याने पोलिसांकडून सोशल डिस्टस्टींग नियमांची अंमलबजावणी करण्याची सक्ती केली जात होती. उरण, अलिबाग येथील बाजारात या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने पोलिसांना कारवाई करावी लागली होती. त्याचबरोबर माशांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. यामुळे ग्राहकांनीही मासळीकडे पाठ फिरवली होती. सोमवारपासून काही उद्योग सुरु करण्यास सूट देण्यात आली असल्याने येथील मच्छीमारांनीही मासेमारीला जाण्याचा निर्णय घेतला आहे.  मासेमारी बंद राहिल्याने सुक्या मासळीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. यासाठी मासेमारी सुरु होणे गरजेचे होते.

मासेमारीला जाऊ नये, असे कोणतीही बंधने टाकण्यात आले नव्हते. मच्छीमारांनीच वेगवेगळ्या कारणामुळे मासेमारी बंद ठेवली होती. या दरम्यान झालेल्या नुकसानीतून दिलासा मिळण्यासाठी 
शासनाने मदत करावी, अशीही मागणी केली जात आहे.
-सुरेश भारती
उपायुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग

मासळी वाहतुक करण्यासाठी वाहने उपलब्ध नाहीत. माल वाहतुकीला किती प्रमाणात शिथिलता देण्यात येत आहे, यावरुन मासेमारीचा निर्णय येथील मच्छीमार घेऊ शकतील. अद्यापही मच्छीमारांमध्ये याबद्दल संभ्रम आहे.
- साईनाथ नखवा, मच्छीमार, आग्राव

 Fishing will restarts in Raigad in lockdown


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com