esakal | लोकलमधून पाच लाख लसवंत प्रवास करू लागले
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Local Train

लोकलमधून पाच लाख लसवंत प्रवास करू लागले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून (Railway) अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि कोरोना (Corona) लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी आहे. त्यामुळे कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी लगेच नागरिक लोकलचे एका महिन्याचे मासिक पास काढत आहेत. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सुमारे पाच लाख लसवंतांचा प्रवास सुरू असून उपनगरीय लोकलमधून (Local) दररोज एक ते दोन हजार प्रवासांची संख्या वाढत आहे.

राज्य सरकारने दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास खुला केला आहे. त्यामुळे कोरोनाचे डोस घेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. अनेक नागरिक लस घेण्यासाठी रात्रीपासून रांगेत राहत आहेत. त्यामुळे 4 लाख 95 हजार 466 नागरिकांनी एका महिन्यांचे मासिक पास काढले आहे. त्यामुळे आता लसवंतांची लोकल, रेल्वे परिसरात वर्दळ वाढू लागली आहे.स्वातंत्र्यदिनापासून कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास खुला झाला आहे. दोन लस धारकांनी मागील चार आठवड्यात प्रमाणपत्राची पडताळणी करून मासिक पास घेतले आहे. मध्य रेल्वे 11 ऑगस्टपासून ते 31 ऑगस्टपर्यंत एकूण 3 लाख 58 हजार 701 नागरिकांनी मासिक पास काढले. तर, पश्चिम रेल्वेवर 11 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीमध्ये 1 लाख 36 हजार 765 नागरिकांनी पास काढले.

हेही वाचा: दापोली : बिबट्याची फासकीतून सुखरूप सुटका

ऑगस्ट महिन्यात प्रतिदिन मध्य रेल्वेवरून सरासरी 19 लाख प्रवाशांचा, तर पश्चिम रेल्वेवरून प्रतिदिन सरासरी 11 लाख प्रवाशांचा प्रवास होत होता. या प्रवाशांसाठी सध्या मध्य रेल्वेवर 1 हजार 686 फेऱ्या आणि पश्चिम रेल्वेवर 1 हजार 300 फेऱ्या धावत आहेत.

मध्य रेल्वेवरील पास विक्री

11 ऑगस्ट 22,689

12 ऑगस्ट 22,104

13 ऑगस्ट 17,765

14 ऑगस्ट 16,439

15 ऑगस्ट 13,327

16 ऑगस्ट 27,124

17 ऑगस्ट 24,013

18 ऑगस्ट 16,341

19 ऑगस्ट 15314

20 ऑगस्ट 17024

21 ऑगस्ट 12,919

22 ऑगस्ट 8,556

23 ऑगस्ट 25,872

24 ऑगस्ट 18,695

25 ऑगस्ट 16,785

26 ऑगस्ट 16,628

27 ऑगस्ट 13,742

28 ऑगस्ट 11,976

29 ऑगस्ट 8092

30 ऑगस्ट 19,499

31 ऑगस्ट 13,565

एकुण 3 लाख 58 हजार 701

पश्चिम रेल्वे पास विक्री

11 ऑगस्ट 11,664

12 ऑगस्ट 10,430

13 ऑगस्ट 7,873

14 ऑगस्ट 7,121

15 ऑगस्ट 7,399

16 ऑगस्ट 11,876

17 ऑगस्ट 9, 566

18 ऑगस्ट 6,313

19 ऑगस्ट 5,462

20 ऑगस्ट 5,774

21 ऑगस्ट 5,294

22 ऑगस्ट 3,941

23 ऑगस्ट 7,346

24 ऑगस्ट 6,266

25 ऑगस्ट 5,267

26 ऑगस्ट 4,903

27 ऑगस्ट 4,614

28 ऑगस्ट 4,349

29 ऑगस्ट 3,121

30 ऑगस्ट 4,990

31 ऑगस्ट 3,181

एकूण 1 लाख 36 हजार 765

loading image
go to top