esakal | मुंबईत आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; मुंबई आणि उपनगरातील रुग्णांचा आकडा ४३ वर
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; मुंबई आणि उपनगरातील रुग्णांचा आकडा ४३ वर

महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०७ वर

मुंबईत आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; मुंबई आणि उपनगरातील रुग्णांचा आकडा ४३ वर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - जगभराप्रमाणे भारतात आणि महाराष्ट्रात कोरणग्रस्तांची संख्या वाढतेय. भारत सध्या कोरोनाच्या चौथ्या आठवड्यात आहे. अशात चौथ्या आणि पाचव्या आठवड्यत कोरोना बाधित पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमानंतर वाढ झाल्याचं आपण पाहिलंय. तशी आकडेवारी उपलब्ध आहे. महाराष्ट्रात आणि मुख्यत्वे मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात कोरोना अजूनही नियंत्रणात आहे. मात्र दररोज मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढतेय हे देखील तेवढंच खरं आहे.  

आज २४ मार्च रोजी दुपारी आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. आज सकाळी आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात कोरोना बाधितांची आकडेवारी १०१ होती. अशात दुपारनंतर आलेल्या अपडेटमध्ये आता महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या ही १०७ वर गेलीये.

मोठी बातमी - 'वर्क फ्रॉम होम'च्या काळात असा बूस्ट करा तुमच्या WiFi इंटरनेटचा स्पीड...

मोठी आणि महत्त्वाची बाब म्हणजे आज सकाळपासून मुंबईत ५ रुग्ण वाढलेत तर अहमदनगरमध्ये १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढलाय. त्यामुळे २४ मार्च संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा महाराष्ट्रातील आकडा आकडा १०७ वर गेलाय. मुंबई आणि उपनगरांमध्ये एकूण ४३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सध्या आहेत. 

आज सकाळी मुंबई मधून एक चांगली बातमी देखील समोर आली होती. मुंबईत याआधी पॉझिटिव्ह आढळलेल्या १२ नागरिकांची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

five new corona covid 19 positive cases detected in mumbai mumbai and suburban count goes on 43