मोठी बातमी - मुंबईतील फोर्ट परिसरातील पाच मजली भानुशाली इमारतीचा ४० टक्के भाग कोसळला

सुमित बागुल
गुरुवार, 16 जुलै 2020

मुंबईत इमारत कोसळण्याचं सत्र थांबण्याचं नाव नाहीये. गेले काही दिवस मुंबईत धुवाधार पाऊस पडतोय. याच पावसाचा परिणाम आता मुंबईतील धोकादायक इमारती आणि भिंती कोसळण्याच्या स्वरूपात पाहायला मिळतोय.

मुंबई : मुंबईत इमारत कोसळण्याचं सत्र थांबण्याचं नाव नाहीये. गेले काही दिवस मुंबईत धुवाधार पाऊस पडतोय. याच पावसाचा परिणाम आता मुंबईतील धोकादायक इमारती आणि भिंती कोसळण्याच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. मुंबईतील मालवणी नंतर आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुंबईतील अत्यंत महत्त्वाच्या अशा फोर्ट भागात आज आणखी एक इमारत कोसळली आहे. 

 

भानुशाली असं या इमारतीचं नाव असून गाऊंड अधिक पाच मजली ही इमारत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. दुर्दैवी बाब म्हणजे इमारत कोसळल्याने या इमारतीच्याच्या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. नागरिकांसह या इमारतीच्या ढिगाऱ्यात काही दुचाकी आणि चारचाकी अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय.

मोठी बातमी  : मुंबईतील मालवणीत भागात दोनमजली इमारत कोसळली, अनेकजण ढिगाऱ्यात अडकल्याची भीती

मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीला धोकादायक इमारत म्हणून नोटीस बजावण्यात आली होती. धोकादायक इमारत म्हणून नोटीस बजावल्याने या बिल्डींमधील काही जण इमारत सोडून दुरीकडे वास्तव्यास गेले होते. रहिवासी अधिक कमर्शियल अशा या इमारतीत  ३० ते ३५ फ्लॅट्स होते. धक्कादायक बाब म्हणजे एकाबाजुची इमारत कोसल्यांनंतरही दुसऱ्या बाजूला गॅलरीमध्ये काही नागरिक आढल्याचं भयानक चित्र पाहायला  मिळतंय. सध्या युद्ध पातळीवर इमारतीचा ढिगारा उपासण्याचं आणि रेस्क्यू ऑपरेशनचं काम सुरु आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार या इमारतीची माती पडू लागण्याने इमारतीमधीलच काही नागरिकांनीच इतरांना इमारत रिकामी करायला सांगितलं होतं. सदर इमारतीचा ४० टक्के भाग कोसल्याचं पोलिसांनी सांगितलंय. 

five storied bhanushali building in fort area collapsed rescue operation starts


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five storied bhanushali building in fort area collapsed rescue operation starts