esakal | भाभा रुग्णालयातून पाच वर्षाचा मुलगा बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

children missing

भाभा रुग्णालयातून पाच वर्षाचा मुलगा बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल

sakal_logo
By
अनिष पाटील

मुंबई : वांद्रे येथील भा. भा रुग्णालयातून (Bhabha Hospital) पाच वर्षांचा मुलगा बेपत्ता (Five year child missing) झाला आहे. याप्रकरणी नर्स मानसी पाटील यांच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी (Bandra police) अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. मुलाचे नाव बिलाल अल्ताफ (Bilal Altaf) असून तो रुग्णालयाच्या समोरील आश्रय सेंटरमध्ये होता. शनिवारी सकाळी पाटील यांनी बिलाल यांच्यासह आणखी दोन मुलांना भा.भा. रुग्णालयात आणले होते. त्यावेळी बिलाल गायब झाला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सर्व ठिकाणी शोधले असता तो सापडला नाही. अखेर त्यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार (Police Complaint) केली. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ( Five year Bilal Altaf missing From Bandra bhabha hospital -nss91)

loading image
go to top