esakal | पाच वर्षाच्या मुलाला आईसोबत कारागृहात ठेवू नका: सत्र न्यायालय
sakal

बोलून बातमी शोधा

 session Court

पाच वर्षाच्या मुलाला आईसोबत कारागृहात ठेवू नका: सत्र न्यायालय

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : घरातील वादातून दिराच्या पत्नीची जाळून हत्या (Woman murder) केल्याच्या आरोपात जन्मठेपेची (Murder Crime) सजा सुनावलेल्या महिलेच्या पाच वर्षांच्या मुलाला कारागृहात न ठेवण्याचे आदेश सत्र न्यायालयाने (Session Court) दिले आहेत. कारागृहात राहिल्यास मुलाच्या मानसिक विकासावर (Child Mentality) नकारात्मक परिणाम होऊ शकतात, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. (Five Year Child should not be in prison with mother for child mentality reason says session court)

घरातील जागेच्या वादातून आरोपी इकबाल खान (50) आणि त्याची पत्नी शाहीन (40) यांनी वहिनीची जाळून हत्या केली, असा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. मृत तसबीरुन्नीसा या पन्नास टक्के भाजलेल्या होत्या. मृत्युपूर्व त्यांनी दिलेल्या जबानीत आरोपींची नावे घेतली होती. गोवंडी मध्ये त्यांचे घर असून घराची विभागणी झाली आहे. यावरून दोन्ही आरोपींबरोबर वाद झाला आणि त्यांनी पिडीत महिलेवर केरोसीन टाकून जाळले, असे पोलिसांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा: चांगली बातमी: आठवी ते बारावी शाळा होणार सुरु

सत्र न्या. संजश्री घरत यांच्या पुढे खटल्याची सुनावणी झाली. अभियोग पक्षाने एकूण तेरा साक्षीदारांंचा जबाब नोंदविला. आरोपी मागील पाच महिन्यापासून अटकेत आहेत. त्यावेळी त्यांचा पाच वर्षाचा मुलगा आईबरोबर होता. न्यायालयाने सबळ पुराव्यांच्या आधारावर दोघांना दोषी ठरवून जन्मठेपेची सजा सुनावली. तसेच पाच वर्षाच्या मुलाचे संगोपन शाहीनच्या बहिणीने करण्याचे निर्देश दिले. जर मुलगा कारागृहात आईबरोबर राहिला तर त्याच्यावर शारीरिक आणि मानसिक विपरीत परिणाम होऊ शकतो असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. संयुक्त संघाच्या नियमांचा दाखलाही न्यायालयाने दिला आहे. कोठडीत असलेल्या आईकडे मुलाला ठेवण्याचा पर्याय सर्वात शेवटचा असतो, त्यापूर्वी अन्य पर्याय वापरायला हवा, असे यामध्ये म्हटले आहे.

आरोपीला दया दाखविता येणार नाही, कारण पिडीत मृत महिलेने जळाल्यावर अत्यंत यातना सहन केल्या. घरातील छोट्या जागेवरून तिला मारण्यात आले आणि तिला देखील लहान बाळ आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. ऑक्टोबर 2015 मध्येही घटना घडली होती. मृत महिलेला तीन मुले आहेत.

loading image