अंधेरी-घाटकोपर जंक्‍शनवरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; मुंबईहून ठाण्याला वेगात पोचता येणार

तेजस वाघमारे
Monday, 9 November 2020

पूर्व द्रुतगती महामार्गावरील अंधेरी-घाटकोपर जंक्‍शनवर नव्याने बांधण्यात आलेल्या दक्षिण दिशेच्या उड्डाणपुलाचे उद्‌घाटन सोमवारी (ता. 9) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गावरील अंधेरी-घाटकोपर जंक्‍शनवर नव्याने बांधण्यात आलेल्या दक्षिण दिशेच्या उड्डाणपुलाचे उद्‌घाटन सोमवारी (ता. 9) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. नव्या उड्डाणपुलामुळे मुंबईहून ठाण्याला जाण्यासाठी चांगली कनेक्‍टिव्हिटी मिळणार आहे. 

कल्याण रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, रेल्वे प्रशासनाचा निर्णय

अंधेरी-घाटकोपर जंक्‍शनवरील गर्दी कमी करण्यासाठी तसेच मुंबई व घाटकोपरकडे जाणारी वाहतूक वेगळी करण्यासाठी 12 मीटर रुंदीचा उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला होता. मुंबईहून ठाण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना तीन मार्गांचा उड्डाणपूल होता. त्यामुळे प्रवाशांना अंधेरी-घाटकोपर जंक्‍शनवर मोठ्या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी मुंबईच्या दिशेने एमएमआरडीएने तीन मार्गांचे नवीन उड्डाणपुलांचे काम सुरू केले. आता नव्याने तयार करण्यात आलेला उड्डाणपूल वाहतुकीसाठी सोमवारपासून खुला झाल्याने आता प्रवाशांना दोन्ही दिशांनी सुरळीत व सुरक्षित वाहतुकीचा अनुभव घेता येणार आहे. 

अर्णब गोस्वामी यांच्या पुनर्निरीक्षण याचिकेवर मंगळवारी सुनावणी; पोलिसांना दररोज तीन तास चौकशीला परवानगी

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव म्हणाले की, नव्या उड्डाणपुलामुळे एमएमआरडीएमार्फत वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील अंधेरी-घाटकोपर जंक्‍शनवर सर्वाधिक वाहतूक होते. नवीन उड्डाणपुलामुळे जंक्‍शनवरील वाहतुकीची वर्दळ आणि कोंडी कमी होईल. कोरोनाच्या काळात अनेक अडचणी येत असतानाही एमएमआरडीए टीम आणि नियुक्त कंत्राटदाराने नियोजनपूर्वक काम केले. 

Flyover at Andheri Ghatkopar junction open for traffic You can reach Thane faster from Mumbai
------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flyover at Andheri Ghatkopar junction open for traffic You can reach Thane faster from Mumbai