अवकाळीने चाऱ्याचे भाव कडाडले; अडचणींमुळे दुग्ध व्यवसायिकांचा डोक्याला हात

लक्ष्मण दुबे
Wednesday, 6 January 2021

रसायनी परिसरात अवकाळी पावसाचा भाताच्या पिकाला फटका बसल्याने नुकसान झाले होते. परिणामी, आता वैरणीचा (पेढ्याचा) तुटवडा भासत असून त्याच्या मागणीत वाढ झाली आहे.

रसायनी  : रसायनी परिसरात अवकाळी पावसाचा भाताच्या पिकाला फटका बसल्याने नुकसान झाले होते. परिणामी, आता वैरणीचा (पेढ्याचा) तुटवडा भासत असून त्याच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी, परिसरातील दुग्ध व्यावसायिकांना जास्त भावाने वैरण खरेदी करावे लागत असल्याने ते हताश झाले आहेत. 

मुंबई , रायगडा परिसरातील बातम्याचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

रसायनी परिसरातील वडगाव, वासांबे मोहोपाडा, आपटे, चावणे, पंचक्रोशीतील शेतकरी पावसाळी खरिपाच्या हंगामात भाताचे पीक घेत आहे. या वर्षी भाताचे पीक चांगले आले होते; मात्र अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे कापणीला आलेल्या भातपिकाचे नुकसान झाले आहे. तर काहींचे पीक कुजून गेले आहे, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. सध्या परिसरातील शेतकऱ्यांची झोडपणीची कामे सुरू आहेत. याच दरम्यान बाहेर गावच्या दुग्ध आणि इतर व्यवसाय, तसेच परिसरातील दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांकडून वैरणीला मागणी वाढत आहे. अनेक व्यावसायिक इतर गावागावांत फिरून वैरण विकत घेत असल्याने भाव आणखी वाढत आहेत. 

 

अनेक शेतकऱ्यांनी वैरणी विकल्या आहेत. शिल्लक असणाऱ्या वैरणीला शेतकऱ्यांना शेकडा सुमारे 800 रुपये भाव मिळत आहे. चांगला भाव मिळत असल्याने शेतकरीही समाधान व्यक्त करत आहेत. 
- महेंद्र धुरव,
शेतकरी 

सुरुवातीला साधारण महिन्याभरापूर्वी वैरण खरेदी केले होते. त्यावेळी 700 रुपये शेकडाने वैरण घेतले. 
- लालीबाई कोकरे,
दुग्ध व्यवसायिक 

-fodder prices increases; dairy traders problems due to difficulties

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fodder prices increases; dairy traders problems due to difficulties in rasayani raigad