मोठी बातमी : फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा 'स्पाईक', कोरोनाचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक

मोठी बातमी : फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा 'स्पाईक', कोरोनाचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक

मुंबई, 02 : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असताना अचानक फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा रुग्णांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. 1 ते 31 जानेवारी यादरम्यान 90 हजार  673 कोरोना प्रकरणे होती. तीच संख्या फेब्रुवारी दरम्यान 1 लाख 26 हजार 723 पर्यंत वाढली. त्यानुसार, गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रात कोविड -19 घटनांमध्ये 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार 1 ते 31 जानेवारी दरम्यान 90 हजार 673 प्रकरणे होती, ती फेब्रुवारीमध्ये वाढून 1 लाख 26 हजार 723 वर गेली आहेत. कोविड नियमांचे पालन न केल्याने आणि राज्यभरात कोरोना व्हायरस चाचणी सुविधांच्या संख्येत वाढ झाल्याने शिवाय, वाढलेला बेजबाबदारपणा या सर्वामुळे ही प्रकरणे वाढली असल्याचे राज्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापासून प्रकरणांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. लोकांचा हलगर्जीपणा, व्हायरसचे बदललेले स्वरुप आणि अनलॉक केल्याचा परिणाम ही तीन मुख्य कारणे यामध्ये अधिकाऱ्यांकडून सांगितली जात आहेत. कोविड 19 चा आलेख उतरता करण्यासाठी, साखळी तोडण्यासाठी आणि विषाणूचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध राज्याने कमी केले. त्याचा ही परिणाम या सर्वावर दिसून येत आहे.

“आम्ही नागरिकांना कोविड 19 प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याचे आवाहन करत आहोत. ही प्रकरणे नियंत्रित करण्यासाठी आम्ही आमचे सर्व प्रोटोकॉल तीव्र केली आहेत आणि सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील प्रकरणांमध्ये वाढ झाल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. असे राज्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

राज्य सरकारचे तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले की, ही दुसरी लाट आहे की नाही हे सांगणे फार अवघड आहे, मात्र, नागपूर, अमरावती ते औरंगाबाद (मराठवाडा प्रदेशात) पासून सुरू होणाऱ्या विदर्भासारख्या काही भागात या भागात विषाणूची तीव्र वाढ दिसून येत आहे. आता हळूहळू हा विषाणू पुणे आणि मुंबईसारख्या इतर जिल्ह्यांमध्ये संक्रमित होत आहे.

'ही' पावलं उचलणे गरजेचे -

"लॉकडाउन हा शेवटचा पर्याय आहे. मायक्रो-कंटेनमेंट झोनची स्थापना करणे, प्रतिबंध ठिकाणच्या हालचालींवर निर्बंध, जास्तीत जास्त चाचण्या करणे ही महत्त्वाची पाऊले उचलणे गरजेचे आहे, असे राज्य कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com