esakal | "मुंबईत रात्री ११:०० नंतर पार्टी संपवू नका", मुंबई महापालिकेने दिली मोठी खुशखबर
sakal

बोलून बातमी शोधा

"मुंबईत रात्री ११:०० नंतर पार्टी संपवू नका", मुंबई महापालिकेने दिली मोठी खुशखबर

आहारनं नवीन वर्षाच्या पहाटे दीड वाजेपर्यंत अन्न वितरण आणि होम डिलिव्हरी सेवा वाढविण्याच्या निर्णयाचे स्वागत केलय.

"मुंबईत रात्री ११:०० नंतर पार्टी संपवू नका", मुंबई महापालिकेने दिली मोठी खुशखबर

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबईत रात्री ११:०० नंतर पार्टी संपवू नका, नूतन वर्षाचे स्वागत घरीच करा. कारण आता मुंबईत उपहारगृहांना (रेस्टॉरंट) रात्री ११ नंतर घरपोच सेवा देण्यास अनुमती देण्यात आली आहे. मुंबईस सुरक्षितरित्या नवीन वर्षात पदार्पण करण्याकरिता कोरोनाविषयीच्या सर्व सुनिश्चित नियमांचे काटेकोरपणे पालन करा असं महापालिकेकडून सांगण्यात आलं होतं. यासाठीची विशेष नियमावली राज्य सरकारने जारी केली होती. ज्यामध्ये रात्री ११ वाजेनंतर घरी पार्सल सेवा मिळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह होतं. मात्र आता मुंबई महापालिकेने घरपोच पार्सलच्या सेवेस अनुमती दिली आहे. नवीन वर्षाच्या पहाटे दीड वाजेपर्यंत अन्न वितरण आणि होम डिलिव्हरी सेवा देण्यास महापालिकेकडून परवानगी दिली आहे.

महत्त्वाची बातमी : प्रदूषणास जबाबदार कपन्यांना MPCB च्या नोटिसा, MMR भागातील या 40 कंपन्या पसरावतायत प्रदूषण

दरम्यान, आहारनं नवीन वर्षाच्या पहाटे दीड वाजेपर्यंत अन्न वितरण आणि होम डिलिव्हरी सेवा वाढविण्याच्या निर्णयाचे स्वागत केलय. हॉटेल व्यवसाईकांच्या आहार या संघटनेनं बीएमसीचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, संजीव जयस्वाल यांनी जाहीर केलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे . रेस्टॉरंट्स आणि बार मधून अन्न वितरण रात्री 11 वाजेपर्यंत बंद होण्याऐवजी सकाळी 1.30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत सेवा. याचा अर्थ असा आहे की रेस्टॉरंट्स आणि बार रात्री 11 वाजता बंद होतील. परंतु नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला, रात्री घरातं अन्न देण्याकरिता त्यांचे स्वयंपाकघर रात्री 1.30 वाजेपर्यंत खुली राहील.

मुंबई भागातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Mumbai News in Marathi from Thane, Navi Mumbai, Vasai-Virar, Mira Bhayandar, Kalyan Dombivali 

आहारचे अध्यक्ष श्शिवानंद शेट्टी यानी प्रतिक्रिया देताना म्हंटलं की, किमान मुदतवाढ देण्याबाबत आपला मुद्दा विचारात घेतल्यानंतर आम्ही शेवटच्या क्षणी झालेल्या या घोषणेवर खूष आहोत. नवीन वर्षात अन्नाचा साठा करण्याच्या बाबतीत जास्त अनागोंदी न येता आमच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल.  आम्ही आमच्या सदस्यांना रात्रीच्या संचारबंदीदरम्यान आमच्या ऑपरेशन्सवर नियंत्रण ठेवत असलेल्या सर्व नियम आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगू.

food and beverage home delivery will be given till half past one on 31st night

loading image
go to top