Mumbai: सीसीटीव्ही मध्ये दिसलेल्या चपलेवरून शोधली २ लाखांच्या मोबाईलची चोरी, पोलीस जोमात चोर कोमात

ट्रेनमध्ये २ लाखांचा मोबाईल चोरीला
Footwear image helps trace Rs 2 lakh phone stolen from train in Mumbai
Footwear image helps trace Rs 2 lakh phone stolen from train in Mumbai

मोबईल चोरीच्या अनेक घटना समोर येत असतात. पण मुंबईत मोबाईल चोरीच्या घडलेल्या घटनेत रेल्वे पोलिसांची चतुराई पाहायला मिळाली. सीसीटीव्ही मध्ये दिसलेल्या चपलेवरून २ लाखांच्या मोबाईलची चोरी रेल्वे पोलिसांनी शोधली. (Footwear image helps trace Rs 2 lakh phone stolen from train in Mumbai)

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर एका महिला प्रवाशाचा हरवलेला सापडल्याची माहिती समोर आली. आरोपी हेमराज बन्सीवाल (30) याने फोनची खरी किंमत माहीत नसताना केवळ 3500 रुपयांना मित्राला फोन विकला होता. त्याचा मित्र देवीलाल चौहान (३२) यालाही अटक करण्यात आली आहे. (Marathi Tajya Batmya)

नेमकं घडलं तरी काय?

महिलेने 24 मे रोजी रेल्वे पोलिसांकडे मोबाईल फोन हरवल्याची तक्रार दाखल केली होती. हिला सीएसएमटी स्थानकात उतरली तेव्हा तिला आपला मोबाईल फोन हरवल्याचे लक्षात आले. तिने त्याच ट्रेनमध्ये फर्स्टक्लासच्या डब्यात परत जाऊन पाहिले तेव्हा मोबाईल फोन तिकडे नव्हता. या मोबाईल फोनची किंमत जवळपास २ लाख रुपये इतकी होती.

Footwear image helps trace Rs 2 lakh phone stolen from train in Mumbai
Maharashtra Politics : ठाकरेंसाठी काय पण! शरद पवार घेणार मोठा निर्णय

महिलेने रेल्वे पोलिसांना तक्रार दिली तेव्हा आपला मोबाईल फोन कोणी चोरला की तो ट्रेनमध्ये राहिला, याविषयी तिला खात्री नव्हती. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी CSMT स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. (Latest Marathi News)

त्यामध्ये एक व्यक्ती लोकल ट्रेनच्या महिलांच्या डब्यात चढत असल्याचे दिसले. त्यानंतर हा व्यक्ती सीएसएमटी स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या व्यक्तीचा चेहरा ब्लर दिसत होता. त्यामुळे त्याची नेमकी ओळख पटवणे शक्य होत नव्हते.

Footwear image helps trace Rs 2 lakh phone stolen from train in Mumbai
Jayant Patil: 'माझी परवानगी घेऊनच 6 महिन्यासाठी शिंदे गटात...',राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांबद्दल पाटलांचे मोठं वक्तव्य

अशी पकडली चोरी

चोराची ओळख पटणे शक्य नव्हते. त्यावेळी रेल्वे पोलिसांनी शक्कल लढवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तीच्या पायातील चपला आणि चालण्यावर लक्ष ठेवले. (Latest Marathi News)

Footwear image helps trace Rs 2 lakh phone stolen from train in Mumbai
Maharashtra SSC Result 2023 Live: दहावीचा निकाल किती वाजता लागणार; जाणून घ्या महत्त्वाची माहिती

ज्या महिलेचा मोबाईल फोन हरवला होता ती सकाळी साडेअकरा वाजताच्या लोकल ट्रेनने सीएसएमटी स्थानकात उतरली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासूनच पोलिसांनी या वेळेस येणाऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. (Latest Marathi News)

विशेष म्हणजे त्याच दिवशी दुपारच्या सुमारास फलाट क्रमांक १ आणि २ वर लक्ष ठेवत असताना रेल्वे पोलिसांना तशाच चपला घातलेला आणि चालण्याची विशेष सवय असलेला व्यक्ती दिसला.त्यानंतर रेल्वे पोलिसांनी या व्यक्तीला तातडीने ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर या व्यक्तीने दोन दिवसांपूर्वी ट्रेनमधील मोबाईल फोन घेतल्याची कबुली दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com