esakal | मेट्रोसाठी मालाडमध्ये झोपडपट्ट्यांवर कारवाई, अतुल भातखळकरांना घेतलं ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रोसाठी मालाडमध्ये झोपडपट्ट्यांवर कारवाई, अतुल भातखळकरांना घेतलं ताब्यात

मेट्रोसाठी मालाडमध्ये झोपडपट्ट्यांवर कारवाई, अतुल भातखळकरांना घेतलं ताब्यात

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मालाडच्या कुरार भागात मेट्रोच्या कामासाठी झोपडपट्ट्या पाडण्याचं काम सुरु झालं आहे. या कारवाई विरोधात स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. नागरिकांकडून पाडकामाच्या कारवाईला विरोध करण्यात येत आहे. स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांना या कारवाईबद्दल समजताच ते तिथे दाखल झाले व कारवाईला विरोध केला. त्यामुळे वनराई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. (For metro station Mumbai malad kurar area slum demolition action bjp mla atul bhatkhalkar arrest by police dmp82)

कुरार मेट्रो स्टेशनच्या उभारणीमध्ये अडथळा ठरणाऱ्या काही झोपड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. रात्री १२ च्या सुमारास झोपडपट्टीवासियांना नोटिसा देऊन आज सकाळीच पोलिसांच्या लवाजम्यासह पथक दाखलं झालं. त्यामुळे स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

हेही वाचा: 'चला !!! मनसे विद्यार्थी सेनेचं ग्रहण सुटलं', अभिजीत पानसेंचा मार्मिक टोला

"शुक्रवारी रात्री १२ वाजता नोटिसा देऊन आज सकाळी ९ च्या आधीच प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. भर पावसात कारवाई सुरू करण्यात आली. लोकांना मारहाण करत घराच्याबाहेर काढलं. आम्ही त्याला विरोध केला. त्यामुळे आम्हाला ताब्यात घेतलं. ठाकरे सरकारची मोगलाई" अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

"कुरारची कारवाई, ठाकरे सरकारचा अत्याचारी चेहरा दाखवणारी. हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यास मनाई केली आहे. तरीही पोलिसांनी बेकायदेशीरपणे बळजबरी करून तोडक कारवाई केली. आम्ही सोमवारी पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू" असं अतुल भातळखर यांनी म्हटलं आहे.

loading image