Badlapur News : बदलापूरची ती मदतीच्या प्रतीक्षेत! आश्वासने हवेतच, दीड वर्षांपासून सरकारने फी भरलीच नाही; तर शाळेकडून तगादा

दोन वर्षांपूर्वी राज्याला हादरवणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर आक्रोश करण्यात आला. यातील आरोपीचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला; पण तिच्या शालेय शिक्षणाचे आश्वासन मात्र हवेतच विरले आहे.
School Girl

School Girl

sakal

Updated on

ठाणे - काही जखमा काळाने भरून निघत नाहीत; उलट काही प्रश्न काळानुसार अधिक तीव्र होतात. बदलापूरच्या ‘त्या’ चिमुरडीची कहाणीही अशीच न भरणाऱ्या जखमेची साक्ष देत उभी आहे. दोन वर्षांपूर्वी राज्याला हादरवणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर आक्रोश करण्यात आला. यातील आरोपीचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला; पण तिच्या शालेय शिक्षणाचे आश्वासन मात्र हवेतच विरले आहे. सरकारने अजूनही तिच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली नसल्याने आजही तिचे भवितव्य ‘न्याय’ आणि ‘शिक्षण’ या दोन शब्दांमध्ये अडकून पडले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com