'उद्धवजी ठाकरे मित्रच नव्हे, तर देवही बदलले'; वाचा फडणवीस यांच्या आक्रमक भाषणातील मुद्दे 

टीम ई-सकाळ
Thursday, 8 October 2020

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'राज्यात सध्या एकच धंदा सुरू आहे तो म्हणजे बदल्यांचा. राज्य सरकार प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम सरकार करत आहे. कोरोनामध्ये लोक मरत असताना भ्रष्टाचार सुरू आहे.'

मुंबई : राज्य सरकारने मंदिर उघडण्याऐवजी दारूची दुकाने उघडली आहेत. उद्धवजी ठाकरे तुम्ही मित्र बदलले. पण, तुम्ही देव ही बदलले, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. महाराष्ट्र राज्य भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीस बोलत होते. राज्यात कोरोनामुळं 39 हजार जणांचा मृत्यू झाला असताना, मंत्र्यांना झोप कशी लागते, असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला.

मुंबईच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'राज्यात सध्या एकच धंदा सुरू आहे तो म्हणजे बदल्यांचा. राज्य सरकार प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम सरकार करत आहे. कोरोनामध्ये लोक मरत असताना भ्रष्टाचार सुरू आहे. कोणी विचार करू शकतो का? महाराष्ट्रात बलात्कार सुरू आहेत. कोविड सेंटरमध्ये बलात्काराच्या घटना होत आहेत. महाराष्ट्राची बदनामी सरकारच्या निष्क्रयतेमुळे होत आहे.  हाथरसच्या घटनेचा निषेध करायला सर्व जण रस्त्यावर आहेत. राजस्थानमध्ये दलित भगिनीवर अत्याचार झाला तेव्हा कुठे होता तुम्ही? महाराष्ट्रातील गृहमंत्र्यांना हाथरसची घटना दिसते महाराष्ट्राचं का?' हिंगनघाटला मुलीला जाळण्यात आलं का नाही तुम्ही गेला, असा प्रश्न फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केला. सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत निष्क्रीय आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केली.'

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

  • आमच्याकडे राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आले आहेत; सर्व काही पुराव्यांनिशी मांडू 
  • मराठा आरक्षण याविषयावर राज्य सरकार आकलेचे तारे तोडत आहे
  • MPSCपरीक्षेबाबत सरकारने मार्ग काढावा. मात्र, सरकार मराठा समाजाला झुंजवत ठेवत आहे
  • सरकारची मराठा समाजाबाबत चर्चा करायची तयार नाही 
  • ओबीसी आरक्षण कायम रहावे ही भाजपची भूमिका 
  • निसर्ग चक्रीवादळानंतर कोकणवासीयांना शिवसेनेकडून खूप अपेक्षा होत्या. पण, काही मिळाले नाही

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former cm devendra fadnavis statement cm uddhav thackeray