Pradeep Sharma: मोठी बातमी! माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा!

Who is Pradeep Sharma: मुंबई हायकोर्टाने माजी पोलिस आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता रद्द केली आहे.
Who is Pradeep Sharma
Who is Pradeep Sharmaesakal

Who is Pradeep Sharma

मुंबई हायकोर्टाने माजी पोलिस आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता रद्द केली आहे. 2006 च्या लाखनभैया बनावट चकमक प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

नोव्हेंबर 2006 च्या लाखनभैया बनावट चकमक प्रकरणातील 12 आरोपींना ट्रायल कोर्टाने ठोठावलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. ट्रायल कोर्टाने 13 अन्य आरोपींना दोषी ठरवले होते आणि प्रदीप शर्माची निर्दोष मुक्तता केली होती.

परंतु हायकोर्टाने प्रदीप शर्माची निर्दोष सुटका रद्द केली आणि पुराव्याच्या आधारे त्यांना दोषी ठरवले. एकूण 13 आरोपींना हायकोर्टाने दोषी ठरवले आहे. प्रदीप शर्मा हे अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातीलही आरोपी आहेत.

कोण आहेत प्रदीप शर्मा?

प्रदीप शर्मा हे मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेत एक अधिकारी होते. एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या नावावर 100 हून अधिक चकमकींचा विक्रम आहे. ते 1983 मध्ये पोलीस सेवेत रुजू झाले आणि 2019 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

प्रदीप शर्मा यांनी 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. यानंतर, 25 फेब्रुवारी 2021 रोजी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या घरातील अँटिलिया बाहेर स्फोटक पदार्थ सापडल्याच्या प्रकरणामुळे ते चर्चेत आले. याप्रकरणी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला अटक करण्यात आली होती.

Who is Pradeep Sharma
Supreme Court Notice to Baba Ramdev: बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण हाजीर हो! पतंजलीच्या खोट्या जाहिरातीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने बजावली अवमानाची नोटीस
Who is Pradeep Sharma
Citizenship Amendment Act: CAA वर सर्वोच्च न्यायालयात काय घडलं? केंद्र सरकारला पाठवली नोटीस, पुढील सुनावणी ठरणार महत्वाची

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com