esakal | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची NIA कडून सुरु आहे चौकशी
sakal

बोलून बातमी शोधा

param.jpg

परमबीर सिंह यांना कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात?

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची NIA कडून सुरु आहे चौकशी

sakal_logo
By
Team eSakal

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करुन महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह NIA कार्यालयात दाखल झाले आहेत. NIA चे अधिकारी परमबीर सिंह यांची चौकशी करतायत. सचिन वाझे प्रकरणात परमबीर सिंह यांच्यावर बदलीची कुऱ्हाड कोसळली. कारण एनआयएच्या अटकेत असलेले सचिन वाझे थेट परमबीर सिंह यांना रिपोर्टींग करत होते. परमबीर सिंह यांच्या चौकशीतून एनआयएला काय माहिती मिळते? काय गोष्टी उजेडात येतात, ते लवकरच समोर येईल. 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो कार, त्यानंतर काही दिवसांनी ही कार वापरणाऱ्या मनसुख हिरेन यांची हत्या, या प्रकरणात सचिन वाझेला एनआयएने अटक केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. वादग्रस्त सचिन वाझेची नियुक्ती पुन्हा कोणी केली? असा प्रश्न विरोधकांनी विचारला. आताही दररोज या प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. वाझेच्या आलिशान गाड्या, बाईकची माहिती समोर येतेय. 

लॉकडाऊन का ?कशासाठी? हे प्रश्न चुकीचे आहेत - संजय राऊत

परमबीर सिंह यांना कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात 
१) परमबीर सिंह आयुक्त झाल्यानंतर सचिन वाझेंची मुंबई पोलिस दलात नियुक्ती कुठल्या आधारावर करण्यात आली.
२) वाझेंना कुणाच्या सांगण्यावरून पोलिस दलात घेतले.
३) सर्व महत्वाचे गुन्हे वाझेंनाच का?  इतर वरिष्ठ अधिकारी असताना वाझेंनाच  गुन्हा तपासासाठी का दिला?
४) या संपूर्ण गुन्ह्यात वाझेंचा सहभाग निश्चित झाल्यानंतर ही तातडीने केस का वर्ग केली नाही? चालढकल पणा का केली?
५) अटकेपूर्वी वाझे परमबीर सिंग यांना रिपोर्टिंग करत होता. त्यावेळी तासनतास परमबीर यांची वाझेंसोबत बैठक होत होती. या बैठकीत वाझे काय सांगायचा?
६) गुन्ह्यात वापरलेली गाडी पोलिस आयुक्तालयात कशा आल्या?

(संपादन - दीनानाथ परब)