Uddhav thackeray and Raj Thackeray
sakal
मुंबई - तब्बल १९ वर्षानंतर मतभेद आणि मनभेद बाजूला ठेवत उद्धव व राज ठाकरे हे बंधू पालिका निवडणुकांसाठी एकत्र आले आहेत. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण त्यांच्या संयुक्त सभांनी ढवळून निघेल, असा सर्वांचा होरा होता. मात्र, वेळेअभावी यावेळी ‘भाषण कमी, भेटी जास्त’ हे सूत्र दोन्ही पक्षांनी स्वीकारले आहे. त्यामुळे या भावांची केवळ ११ जानेवारीला एकच संयुक्त सभा होणार आहे.