
मुंबई - उत्तर प्रदेशमधील अयोध्या रामलला ट्रस्ट बँकेच्या अकाऊँटमधून ६ लाख रुपये गायब झाल्याची घटना घडली होती. त्याप्रकरणी चौकशीनंतर पोलिसांना मोठे यश हाती आले आहे. अयोध्या पोलिसांनी याप्रकरणी महाराष्ट्रातून ४ आरोपींना अटक केली आहे. परंतु याप्रकरणातील मास्टरमांईंड अद्यापही फरार असल्याचीही माहिती समोर आली आहे. रामललांच्या बँक अकॉऊंटमध्ये फेरफार करणारा मास्टरमाईंड मुळचा वाराणसी येथील राहणारा आहे. परंतु सध्या तो मुंबईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बॅक अकॉऊंटमधून ९ सप्टेंबर २०२० रोजी ६ लाख रुपये दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आले होते. यासंबधी ट्रस्ट चे महासचिव चंपत राय यांनी अयोध्या कोतवाली मध्ये तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन अयोध्याचे डीआईजी दीपक कुमार यांनी रामलला यांच्या अकॉऊंटवरून पैसे ट्रान्सफर झाल्याची माहिती दिली होती. या खात्याला त्यानंतर गोठवण्यात आले होते. याप्रकरणातील मास्टरमाईंडचा अद्यापही पोलिस शोध घेत आहेत.
दोनवेळा मोठी रक्कम झाली ट्रान्सफर
डीआईजी एससपी दीपक यांनी सांगितले की, ट्रस्टच्या खात्यात ९ लाख ८६ हजार रुपये होते. खात्यातून पैसे काढण्यावर ६ लाखाची लिमिट लावण्यात आली होती. आरोपींनी पहिल्यांदा २ लाख ५० हजार व दुसऱ्यांदा ३ लाख ५० हजार ट्रस्टच्या खात्यातून ट्रान्सफर करण्यात आले. अटक केलेल्या आरोपींमध्ये प्रशांत महाबल शेट्टी ( मुंबई ), विमल लल्ला ठाणे, शंकर सीताराम मुंबई व संजय तेजराज मुंबई, आदींच्या नावे पुढे आली आहेत. या आरोपींच्या मास्टरमाईंडचा अद्यापही शोध सुरू आहे.
पोलिसांनी चारही आरोपींची चौकशी केल्यानंतर, त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. त्यांना आता न्यायालयात उपस्थित केले जाणार आहे. याप्रकरणी कोणी बँक कर्मचारीसुद्धा दोषी आहे का? याची चौकशी केली जात आहे.
Four arrested in connection with Maharashtra connection case of money theft from Ramallah Trust account in Ayodhya
======================
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.