
रायगड : रस्ते अपघातात झालेली वाढ चिंताजनक; आठ दिवसांत चार जणांचा मृत्यू
खालापूर : तालुक्यात रस्ते अपघातात (Road Accident) झालेली वाढ चिंताजनक असून अवघ्या आठ दिवसांत ठिकठिकाणी झालेल्या अपघातांत चार जणांना (Four people death) जीव गमवावा लागला; तर १३ जण जखमी झाले. जखमींपैकी सहा जणांना गंभीर दुखापत झाली आहे. खालापूर (Khalapur) तालुक्यात रस्त्यांचे मोठे जाळे आहे. यामध्ये (Mumbai-pune expressway) मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग, राष्ट्रीय मार्ग तसेच पाच राज्य मार्गांचा समावेश आहे. मात्र, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीचा प्रचंड (Traffic issue) ताण सर्व मार्गावर असतो. रस्त्यांची विविध ठिकाणी सुरू असलेली काम अद्याप प्रलंबित असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अवजड वाहतूक आणि वाहनचालकांचा बेदरकारपणा जीवघेणा ठरत आहे.
हेही वाचा: कर्जत : बैलगाडी शर्यतीत दौलत देशमुख यांचा मृत्यू; आयोजकांवर गुन्हा दाखल
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर चौक गावानजीक १३ मार्चला भरधाव कारची पादचाऱ्यांना धडक बसून एक गंभीर; तर एक किरकोळ जखमी झाला होता; तर त्याच दिवशी संध्याकाळी दुसऱ्या घटनेत चौक हद्दीत नढाळनजीक भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्ता सोडून ती उलटल्याने कारचालक गंभीर जखमी झाला. खोपोली-पेण मार्गावर रिक्षा अपघाताच्या दोन घटना लागोपाठोपाठ घडल्या होत्या. यापैकी १५ मार्चला रिशीवन हॉटेल जवळ अपघातात रिक्षातील एका प्रवाशाला जीव गमवावा लागला. तर चारजण जखमी झाले होते.
दुसरा रिक्षाचा अपघात १६ मार्चला साजगावजवळ घडला. भरधाव रिक्षा झाडाला ठोकून रिक्षा, चालक आणि महिला जखमी झाली. १५ मार्चला बाईक रायडरचा सातमाळ जवळ अपघात घडला. दुचाकी जुना मुंबई-पुणे महामार्गावर अनियंत्रित होऊन अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार पायाला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात उपचार घेत आहे. सावरोली-खारपाडा राज्यमार्गावर शनिवारी (ता.१९) संध्याकाळी दुचाकी आणि टेम्पोच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा लागला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाचा अंदाज न आल्याने १६ मार्चला अपघात घडला. भरधाव कार उलटली होती.
यामध्ये एक महिला गंभीर जखमी, अन्य दोघे किरकोळ जखमी झाले. त्याच दिवशी संध्याकाळी खोपोली पाली राज्यमार्गावर दुर्दैवी घटनेत सायकलवरून जाणाऱ्या आठ वर्षीय मुलाला भरदार ट्रेलरने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तालुक्यातील अवजड वाहतुकीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Web Title: Four People Died In Road Accident At Khalapur In Last Eight Days Raigad Accident News Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..