esakal | अधिवेशनचा आज चौथा दिवस, संजय राठोडांच्या राजीनाम्याबाबत विरोधक विचारणार जाब
sakal

बोलून बातमी शोधा

अधिवेशनचा आज चौथा दिवस, संजय राठोडांच्या राजीनाम्याबाबत विरोधक विचारणार जाब

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. आज राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नासंदर्भात विरोधक दोन्ही सभागृहात आक्रमक राहतील.

अधिवेशनचा आज चौथा दिवस, संजय राठोडांच्या राजीनाम्याबाबत विरोधक विचारणार जाब

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. आज राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नासंदर्भात विरोधक दोन्ही सभागृहात आक्रमक राहतील. वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्विकारला पण तो अद्याप राज्यपालांकडे पाठवण्यात आला नाही. या संदर्भात सरकारला जाब विचारतील.

संजय राठोड यांचा राजीनामा अद्याप मुख्यमंत्र्यांकडेच 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात ठाकरे सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले. त्यानंतर विरोधकांच्या मागणीनंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. २८ फेब्रुवारीला संजय राठोड यांनी राजीनामा दिला. संजय राठोड यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, संजय राठोड यांचा राजीनामा अजूनही राज्यपालांकडे पाठवला नाही आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तीन दिवस उलटल्यानंतरही राठोड यांचा राजीनामा अद्याप राज्यपालांकडे पोहोचलाचं नसल्याचं वृत्त आहे.  त्यामुळे राठोड यांचा राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांकडेच आहे का? असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या संजय राठोड अजूनही वनमंत्री पदावर आहेत.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Fourth day Maharashtra budget session Sanjay Rathod Issue opponent will be aggressive

loading image