एक चूक पडली सव्वा दोन लाखाला; अनोळखी व्यक्तीला 'ओटीपी' सांगण्याची चुक अजिबात करू नका

अनिश पाटील
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

चुकीने झालेल्या व्यवहार रद्द करण्यासाठी पे अॅप्लिकेशनच्या हेल्पलाईनवर दूरध्वनी करणा-या व्यावसायिकाच्या खात्यातून सव्वा दोन लाख रुपये काढण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी माहिम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : चुकीने झालेल्या व्यवहार रद्द करण्यासाठी पे अॅप्लिकेशनच्या हेल्पलाईनवर दूरध्वनी करणा-या व्यावसायिकाच्या खात्यातून सव्वा दोन लाख रुपये काढण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी माहिम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित एक अत्याधुनिक मास्क; जो केवळ कोरोनाला रोखणार नाही तर मारेलही

जयप्रकाश द्विवेदी(56) असे तक्रारदार व्यावसायिकाचे नाव असून ते माहिम येथील रहिवासी आहेत. जुलै महिन्यामध्ये द्विवेदी यांनी पे अॅप्लिकेशनमधून चुकून एका खात्यामध्ये 1999 रुपये भरले होते. हा व्यवहार रद्द करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला. त्यावेळी त्यांनी गुगलवर हेल्पलाईन क्रमांक शोधून काढला. त्यावर दूरध्वनी केला असता हेल्पलाईनच्या एक्झीक्युटीव्हने हा दूरध्वनी उचलला. त्याने द्विवेदी यांना त्यांची समस्या विचारली. त्यावेळी आपल्या अॅप्लिकेशनमधून चुकून दूस-या व्यक्तीला पैसे गेले असून तो व्यवहार रद्द करण्यासाठी दूरध्वनी केल्याचे सांगितले.

त्यावेळी हेल्पलाईनवरील व्यक्कीने द्विवेदी यांच्या डेबीट कार्डचा 16 अंकी क्रमांक विचारला. त्याच्यावर विश्वास ठेऊन त्यांनी कार्ड क्रमांक त्या व्यक्तीला सांगितला. त्यानंतर बोलण्यात गुंतवून कार्डची मुदत तारीख, सीसीव्ही क्रमांक त्या भामट्याने काढून घेतला.

त्यानंतर पैसे परत मिळवण्यासाठी एक वन टाईम पासवर्ड येथील तो सांगण्यास द्विवेदी यांना सांगितले. त्यांनी विश्वास ठेऊन पासवर्डही सांगितला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून 11 व्यवहारांद्वारे दोन लाख 20 हजार रुपये काढण्यात आले. 15 मिनिटांच्या कालावधीत हे 11 व्यवहार झाले. तासभर थांबल्यानंतही पैसे परत न आल्यामुळे त्यांनी मोबाईल तपासला असता त्यांच्या खात्यावरून पैसे गेल्याचे संदेश त्यांना प्राप्त झाले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे द्विवेदी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी माहिम पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान गैरवापर कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तीन हजार किलोमीटर अंतर कापून आलेल्या पक्षाचा राज्यात मृत्यू; बोरिवलीच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात सुरू होते उपचार

सर्च इंजिनमध्ये एडीट हा ऑप्शन उपलब्ध असतो. त्याचाच गैरफायदा घेऊन हे भामटे स्वतःचा क्रमांक हेल्पलाईन क्रमांकावर ठेवतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तींला बँक खात्याची गोपनीय माहिती सांगू नये, असे एका अधिका-याने सांगितले

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fraud of Two and a half lakh rupees from the trader's account