मतदान करा, मोफत आरोग्यतपासणीचा लाभ घ्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

मध्य-पश्चिम रेल्वेवरील तब्बल १९ क्लिनिकमध्ये डॉक्टर सल्ला, बीपी चेकअप, ECG यासारख्या काही आरोग्यसेवांचा लाभ मतदात्यांना मोफत घेता येणार आहे

मुंबई : विधानसभेची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाकडून अनेक मोहिमा राबवण्यात येतायत. अशातच आता ठाणे जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून आगळ्यावेगळ्या प्रकारे जनजागृती करण्यात येतेय. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अनेक स्थानकांबाहेर ‘वनरूपी क्लिनिक’ आहेत. या क्लिनिकमध्ये आता ज्यांनी मतदान केलंय अशांना मोफत आरोग्य तपासणी करता येणार आहे.

ठाण्यासह कळवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ,भांडुप, घाटकोपर, सायन, कुर्ला, चेंबूर या स्थानकांसह आणखीन काही स्थानकांवर ही सुविधा मिळणार आहे. मध्य-पश्चिम रेल्वेवरील तब्बल १९ क्लिनिकमध्ये डॉक्टर सल्ला, बीपी चेकअप, ECG यासारख्या काही आरोग्यसेवांचा लाभ वोटर्सना मोफत घेता येणार आहे

मुंबई ठाण्यात कायम निवडणुकांची टक्केवारी कमी राहिलेली पाहायला मिळाली आहे. अशातच आता निवडणुकीचा टक्का वाढवा यासाठी ही अनोखी मोहीम राबवण्यात येतेय. त्यामुळे मतदान करा आणि मोफत आरोग्य तपासणी करून घ्या.  

WebTitle : free health check up for voters in mumbai thane


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: free health check up for voters in mumbai thane