Power Block : सीएसएमटीत शुक्रवार- शनिवार रात्रकालीन ब्लॉक!

शनिवारी रात्री भायखळा ते सीएसएमटी आणि वडाळा रोड ते सीएसएमटी लोकल सेवा राहणार बंद!
csmt railway staion
csmt railway staionsakal

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म विस्तारासाठी मध्य रेल्वेने आजपासून दोन दिवस शुक्रवार- शनिवार रात्रकालीन विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉक दरम्यान शुक्रवारी रात्री लोकलसह मेल-एक्सप्रेसच्या वाहतूकीत काही बदल करण्यात आले आहे. तर शनिवारी रात्री १२.३० नंतर भायखळा ते सीएसएमटी आणि वडाळा रोड ते सीएसएमटी दरम्यानची लोकल वाहतूक पहाटे साडे चार वाजेपर्यत पुर्णपणे बंद राहणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार/शनिवार रात्री चार तासांचे विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. शुक्रवारी हा ब्लॉक भायखळा ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर असणार आहे. तर शनिवारी रात्री भायखळा ते सीएसएमटी दरम्यान अप-डाउन जलद मार्गावर आणि वडाळा रोड ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप-डाउन दोन्ही मार्गावर ब्लॉक असणार आहे.

शुक्रवारी -

या ब्लॉकमुळे ट्रेन क्रमांक १२५०२ मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस,ट्रेन क्रमांक २२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक ११०५८ अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक ११०२० भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२८१० हावडा-सीएसएमटी मेल दादर स्थानकांपर्यतच चालविण्यात येणार आहे. तसेच सीएसएमटी स्थानकातून कल्याणकरिता रात्री ९.५४ वाजता सुटणारी लोकल आणि कल्याण स्थानकातून सीएसएमटीकरिता रात्री सुटणारी ११.०५ची लोकल रद्द असणार आहे.

शनिवार -

याब्लॉक दरम्यान ट्रेन क्रमांक १२८७० हावडा-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक०१०८० मऊ-सीएसएमटी विशेष, ट्रेन क्रमांक १२०५२मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक २२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक ११०५८ अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक ११०२० भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक ०२१४० नागपूर-सीएसएमटी सुपरफास्ट स्पेशल, ट्रेन क्रमांक १२८१० हावडा-सीएसएमटी मेल या गाड्या दादर स्थानकापर्यतच चालविण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत मुख्य मार्गावरील भायखळा ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते सीएसएमटी स्थानकांदरम्यानची लोकल सेवा बंद राहणार आहे.

ब्लॉक पूर्वी (शेवटच्या लोकल)

  • सीएसएमटी -कसारा रात्री १२.१४

  • कल्याण-सीएसएमटी रात्री १०.३४

  • सीएसएमटी-पनवेल रात्री १२.१३

  • पनवेल-सीएसएमटी रात्री १०.४६

ब्लॉक नंतर (पहिल्या लोकल)

  • सीएसएमटी-कर्जत पहाटे ४.४७

  • ठाणे-सीएसएमटी पहाटे ४

  • सीएसएमटी-पनवेल पहाटे ४.५२

  • सीएसएमटी-बांद्रा पहाटे ४.१७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com