Mokhada News : आदिवासी भागातील विद्यार्थी अनुभवणार अंतराळ; मोखाडातील सहा विद्यार्थ्यांची इस्रो भेट

मोखाडा तालुका हा आदिवासी व अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. येथे शिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या वैज्ञानिक संस्थांबाबत प्रत्यक्ष माहिती मिळण्याची संधी फारच कमी मिळते.
mokhada tribal area student visit isro

mokhada tribal area student visit isro

sakal

Updated on

मोखाडा - आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी तसेच अंतराळ विज्ञानाबाबत प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशाने पालघर शिक्षण विभागाने (जिल्हा परिषद) विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत मोखाडा तालुक्यातील सहा विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार प्रत्यक्ष अंतराळ अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com