
मोखाडा : मोखाड्यातील अतिदुर्गम सावर्डे येथील शेतकरी कुटुंबातील चंद्रकांत श्याम झोले (19) हा आदिवासी तरुण, खडतर मेहनत करून सैन्य दलात भरती झाला आहे. आमदार हरिश्च॔द्र भोये यांनी सावर्डे येथे जाऊन जवान चंद्रकांत झोले याचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे. तसेच देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.