
उल्हासनगर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीच्या मागणीनुसार आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केल्यावर उल्हासनगरातील सुभाष टेकडी चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती उभारण्यात आलेला आहे.10 एप्रिल रोजी पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला असून बाबासाहेबांची 14 एप्रिल ही जयंती पूर्णाकृती पुतळ्याच्या साक्षीने पार पडणार आहे.