
मुंबई : वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत ओबीसी मंत्रालयाने राज्यभरातील विविध मतदार संघांमध्ये ६७४ कामांना तब्बल ७६ कोटी कामांना मंजुरी दिली. मात्र मंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कोणत्याही आमदारांची शिफारस न घेता परस्पर निधी वाटप केल्याची बातमी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्यानंतर ओबीसी विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी या ७६ कोटींपैकी परभणी, नांदेड, हिंगोली ,बीड, बुलडाणा या पाच जिल्ह्यांतील ६० कोटींच्या निधीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘सकाळ’च्या पाठपुराव्याला यश आले.