झाड पडल्यामुळे अनेक गणेश मंडळांचा वीजपुरवठा खंडित 

पूनम कुलकर्णी
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

मुंबई : दादरच्या भवानी शंकर रोडवर झाड उन्मळून पडल्यामुळे बाल मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच विभागातील अनेक गणेश मंडळांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. 

झाड रस्त्याच्या मध्य भागी पडल्यामुळे भवानी शंकर रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सिद्धिविनायक पासून कबुतर खाण्याकडे भवानी शंकर रोडवरून येणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यातच मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने दृश्य पहायला मिळत आहे.

Web Title: ganesh festival 2017 mumbai ganesh festival dadar power cut