मोठी बातमी! यंदा गणेश गल्लीच्या गणपतीची फक्त पूजा मूर्ती; बाप्पाचं ऑनलाईन दर्शन..  

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

गणेश गल्लीतील 'मुंबईचा राजा' हा भव्यदिव्य मूर्तीसाठी ओळखला जातो. 'मुंबईचा राजा'ची मूर्ती सुमारे 22 फुटांची असते.

मुंबई- महाराष्ट्र सध्या कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करतोय. त्यातच मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचं वेगळचं महत्त्वाचं आहे. मुंबई पुण्यासह मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. या गणेशोत्सवादरम्यान मुंबई पुण्यात मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाहायला मिळते.  याच पार्श्वभूमीवर 'मुंबईचा राजा' अशी ख्याती असलेल्या लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने (गणेश गल्ली) यंदा श्रींची मूर्ती केवळ 4 फुटांची ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश गल्लीतील 'मुंबईचा राजा' हा भव्यदिव्य मूर्तीसाठी ओळखला जातो. 'मुंबईचा राजा'ची मूर्ती सुमारे 22 फुटांची असते.

हेही वाचा: पहिला बांबू...सामनाच्या अग्रलेखातून चीनवर निशाणा 

यंदा मंडळानं सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत मूर्तीची उंची चार फुटांवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ पूजेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा यंदा केली जाणार असून ही मूर्ती शाडूची असेल. मूर्तीचं विसर्जनही कृत्रिम तलावात करण्यात येईल. गणेशभक्तांसाठी 'लाईव्ह दर्शन'ची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गणपती मंडळामध्ये चर्चा झाली. कोरोनाच्या संकटामुळे मंडळाने हा निर्णय घेतला आहे. लहान मूर्ती आणून उत्सवाची उंची वाढवणार असल्याची प्रतिक्रिया मंडळाचे सचिव स्वप्निल परब यांनी दिली. 

परळचा राजा गणेशोत्सवाचा मोठा निर्णय: 

परळचा राजाची मूर्ती यंदा तीन फुटांची असणार आहे. तसेच विभागातून वर्गणी न घेणे, विसर्जन मिरवणूक रद्द करून कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करणे असे अनेक महत्त्वाचे निर्णय मंडळानं घेतले असल्याचं मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांनी सांगितले.

कोरोनाचं संकट पाहता खेतवाडीतल्या 31 गणेशोत्सव मंडळांनी साधेपणानं उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्युत रोषणाई, देखावा या गोष्टींसाठी होणारा लाखोंचा खर्च टाळून, कमी उंचीच्या मूर्ती बसवण्यात येईल. तसेच विसर्जनासाठी मंडळाच्या आवारात कृत्रिम तलाव निर्माण केले जातील, अशी माहिती मध्यस्थ मंडळातर्फे नलिन मोदी यांनी दिली.

हेही वाचा: मोठी बातमी - मुंबईनंतर आता नवी मुंबईच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली...

वडाळा येथील श्री राम मंदिरात साजरा होणाऱ्या जीएसबी गणेशोत्सव मंडळानं देखील गणेशोत्सव पुढे ढकलला आहे. यंदाचा गणेशोत्सव भाद्रपद महिन्याऐवजी माघ महिन्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला. जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं.

ganesh galli ganpati idol will be of 4 feet this year 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh galli ganpati idol will be of 4 feet this year