esakal | ऑस्ट्रेलियातील गणेशभक्तही बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज, उत्सव मात्र साधेपणाने 
sakal

बोलून बातमी शोधा

ऑस्ट्रेलियातील गणेशभक्तही बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज, उत्सव मात्र साधेपणाने 

कोव्हिड प्रादुर्भावामुळे या वर्षी गणेशोत्सव देशभरात साधेपणाने साजरा केला जाणार आहे. ऑस्ट्रेलियातही कोव्हिडचे संक्रमण असल्याने तेथील नियमांचे पालन करीत 'ऑस्ट्रेलियाच्या राजा'चा उत्सवही साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय साऊथ ऑस्ट्रिलिया-ऍडलेड स्थित "कला व सांस्कृतिक मंडळा'च्या वतीने घेण्यात आला आहे.पारंपरिक पद्धतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून लेझीम, ढोल-ताशाच्या गजरात "ऑस्ट्रेलियाच्या राजा'चे स्वागत करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील भाविक सज्ज झाले आहेत. 

ऑस्ट्रेलियातील गणेशभक्तही बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज, उत्सव मात्र साधेपणाने 

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

ठाणे : कोव्हिड प्रादुर्भावामुळे या वर्षी गणेशोत्सव देशभरात साधेपणाने साजरा केला जाणार आहे. ऑस्ट्रेलियातही कोव्हिडचे संक्रमण असल्याने तेथील नियमांचे पालन करीत 'ऑस्ट्रेलियाच्या राजा'चा उत्सवही साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय साऊथ ऑस्ट्रिलिया-ऍडलेड स्थित "कला व सांस्कृतिक मंडळा'च्या वतीने घेण्यात आला आहे. मंडळाच्यावतीने ऑनलाईन पास देऊन दर्शनाची वेळ निश्‍चित केली आहे. पारंपरिक पद्धतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून लेझीम, ढोल-ताशाच्या गजरात "ऑस्ट्रेलियाच्या राजा'चे स्वागत करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील भाविक सज्ज झाले आहेत. 

क्लिक करा : कोरोना रिकव्हरीत ठाणे शहराचा डंका: देशासह राज्यात किती क्रमाक पटकावला? वाचा सविस्तर

महाराष्ट्राबाहेर वसलेल्या मराठी भाषकांनी मराठी संस्कृती जपण्यासाठी त्या-त्या शहरांमध्ये "महाराष्ट्र मंडळा'ची स्थापना केली आहे. ऑस्ट्रेलियातील फिनडॉन, ऍडलेड येथे युनायटेड इंडियन्स ऑफ साऊथ ऑस्ट्रिलिया-ऍडलेड स्थित कला व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने गेली चार वर्षे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

या वर्षी कोरोनाने जगभर थैमान घातल्याने ऑस्ट्रेलियातील गणेशभक्तांनी "कोव्हिड मॅनेजमेंट प्लॅन' करून या वर्षी हा उत्सव आनंदाने साजरा करण्याचे ठरवले आहे. मंडळाचे यंदाचे हे पाचवे वर्ष असून 22 व 23 ऑगस्टदरम्यान गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. 

ऑस्ट्रेलियातील गणेशभक्तांसाठी प्रथमच ऑनलाईन दर्शन बुकिंगची सोय करण्यात आली आहे. तसेच उत्सवात भजन, कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशभक्तांना आधीच ऑनलाईन पासचे वितरण करण्यात आले असून आतापर्यंत एक हजार भक्तांनी आपली नोंदणी केली आहे.

क्लिक करा : बाप्पा 28 फुटांवरून थेट 4 फुटावर; साहित्य, मजुरीचे दर वाढल्याने मूर्तिकारांना फटका

मंडपात प्रत्येक व्यक्तीमध्ये 1.5 मीटरचे अंतर राखून प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच प्रवेश करताना भक्तांची नोंदणी करणे, शरीराचे तापमान चेक करणे आदी गोष्टींची खबरदारी घेतली जाणार आहे. या वर्षी हजारपेक्षा जास्त गरजू नागरिकांना फ्लूची प्रतिबंधात्मक लस मोफत देण्यात येणार असून, दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला एक रोप देऊन पर्यावरण संगोपनाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. 

यंदा बिर्ला मंदिराची प्रतिकृती 
भारतातून परदेशात जाणारी 12 फूट उंचीची बाप्पाची पहिली मूर्ती हे मंडळाचे प्रमुख आकर्षण असून या वर्षीही ते जपण्यात आले आहे. देखावा म्हणून बिर्ला मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत आहे. कोव्हिड नियमांचे काटेकोरपणे पालन करून गणेशोत्सव साजरा करणार असल्याची माहिती मंडळाचे ऑस्ट्रेलियातील संस्थापक-अध्यक्ष सदानंद मोरे व कार्यकारी अध्यक्ष मिहिर शिंदे यांनी दिल्याचे साऊथ ऑस्ट्रेलियाचे भारतातील अधिकृत प्रतिनिधी राजेंद्र झेंडे यांनी दिली.
------------------
(संपादन : प्रणीत पवार)
 

loading image
go to top