कोकणात जाणाऱ्या भक्तांची खासगी ट्रॅव्हल्सकडून लूटमार

Travels
Travels

मुंबई - खासगी ट्रॅव्हल्सला एसटीच्या दीडपट शुल्क आकारण्याची मुभा असताना नियम धाब्यावर बसवून सालाबादप्रमाणे यंदाही ऐन गणपतीच्या हंगामात खासगी बसवाहतूकदारांनी प्रवाशांची लूटमार आरंभिली आहे. रत्नागिरीपर्यंत एसटीच्या "शिवनेरी'चे एससी स्लीपरचे तिकीट 872 रुपये असताना खासगी बसवाले त्यासाठी 1800 रुपये म्हणजे दुपटीहून अधिक उकळत आहेत.

मुंबईतून कोकणात जाणाऱ्या रेल्वे, एसटीच्या बसचे आरक्षण पहिल्याच दिवशी फुल झाल्यामुळे आयत्या वेळी चाकरमान्यांचा मोर्चा खासगी ट्रॅव्हल्सकडे वळला आहे. कोकणात जाण्यासाठी अधीर बनलेल्या या भक्तांची ट्रॅव्हल्सवाल्यांकडून दामदुपटीने लूट सुरू आहे. "शिवनेरी'चे कणकवलीत जाण्यासाठी सेमी लक्‍झरीचे तिकीट 650 आहे, तर खासगी बसचे तिकीट किमान 1350 रुपये आहे.

ट्रॅव्हल्सवाल्यांच्या लुटीचा बळी ठरलेले प्रवासी निरंजन गावकर यांनी सांगितले, की दोन महिन्यांपूर्वी कणकवलीला जाण्यासाठी तिकीट काढले. मात्र, अद्याप ते प्रतीक्षा यादीत आहे. प्रवास लांबचा असल्यामुळे हे तिकीट रद्द करून खासगी बसने जायचे ठरवले. मात्र, भाडे अधिक आहे. गणेशोत्सवासाठी जायचेच असल्यामुळे आम्हाला ते द्यावे लागल्याची हतबलता गावकर यांनी व्यक्त केली.

ऐन सणासुदीच्या काळात खासगी वाहतूकदारांवर अंकुश ठेवण्यासाठी परिवहन विभागाने भाड्याचे समान दर आखून द्यावेत, जेणेकरून प्रवाशांची लूट थांबेल.
- श्‍याम मांजरेकर, प्रवासी.

एसटीच्या प्रवासी भाड्याच्या दीडपट जादा भाडे खासगी वाहतूकदारांना आकारता येणार आहे. त्यापेक्षा अधिक भाडे आकारल्यास संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी कायमस्वरूपी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
- शेखर चन्ने, परिवहन आयुक्त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com