Mumbai Crime : पुराणा हिसाब बाकी है; रिक्षातून आलेल्या टोळक्याने आईस्क्रीमवाल्यावर केला सशस्त्र हल्ला

टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
gang came rickshaw attack on ice cream shop owner
gang came rickshaw attack on ice cream shop ownerSakal

डोंबिवली - पुराना हिसाब बाकी है...ची धमकी देऊन रिक्षातून आलेल्या सशस्त्र टोळक्याने आईस्क्रीमवाल्यावर हल्ला केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडीत मंगळवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास ही घटना घडली असून हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. टिळकनगर पोलीस ठाण्यात जखमी आईस्क्रीमवाला दिलू माली (वय 35) याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलू माली याच्यासह त्याचे सहकारी नानालाल शंकरदास वैष्णव, कन्हैयालाल शंकरदास वैष्णव, विनोद बरदीचंद सेन आणि अमरचंद बालूराम साळवी हे संत नामदेव पथ रोडला असलेल्या वसंत वाडीत हातगाडीवर आईसक्रीम तयार करून विक्रीचा व्यवसाय करतात.

मंगळवारी रात्री धंदा बंद करून हातगाडी साफ करण्याचे काम सुरू असतानाच तोंडाला मास्क लावलेले चार जण रिक्षातून उतरले. इससे पुराणा हिसाब बाकी है, अस म्हणत रिक्षातून उतरलेल्या टोळक्याने लाकडी दांडक्यासह चाकूने हल्ला चढविला.

तर अन्य तिघांनी लाथा बुक्क्यांनी चारही आईसक्रीमवाल्यांना चांगलेच बकलून काढले. आईसक्रीमवाल्यांनी या हल्ल्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोर सशस्त्र असल्याने त्यांच्यापुढे आईसक्रीमवाल्यांची डाळ शिजली नाही.

त्यानंतर हल्लेखोरांनी रिक्षातून पळ काढला. हा सारा प्रकार परिसरात लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एकीकडे पोलिसांनी फुटेज ताब्यात घेऊन हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

तर दुसरीकडे केडीएमसी कर्मचारी विनोद लकेश्री याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच आईसक्रीमवाल्यावर देखिल अशाच पद्धतीने हल्ला झाल्याने सुशिक्षितांची सांस्कृतिक नगरी म्हणून म्हणून बिरुदावली मिरविणाऱ्या डोंबिवलीत अराजगता माजल्याचे दिसून येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com