Mosquitos in Jail : कोठडीत होतोय त्रास! दाऊदच्या सहकाऱ्याची बाटलीत मच्छर घेऊन थेट कोर्टात धाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mosquitos_Taloja Jail

Mosquitos in Jail : कोठडीत होतोय त्रास! दाऊदच्या सहकाऱ्याची बाटलीत मच्छर घेऊन थेट कोर्टात धाव

मुंबईतील तळोजा कारागृह आज एका भलत्याच कारणासाठी चर्चेत आलं. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी एजाज लकडावाला या तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे. कोठडीत असलेल्या मच्छरांमुळं तो हैराण झाला असून हे मच्छर एका बाटलीत भरुन तो थेट कोर्टात पोहोचला. वारंवार सांगून तुरुंग प्रशासनानं आपली मागणी पूर्ण केली नसल्याचा आरोपही त्यांन यावेळी केला. (Gangster Ejaj Ejaz Lakdawala reached Mumbai court with mosquitos in a bottle)

हेही वाचा: Rishi Sunak: ऋषी सूनक धर्मानं हिंदू पण मनानं ब्रिटिश! युकेचे राजदूत असं का म्हणाले?

एजाज लकडावाला याला जानेवारी २०२० रोजी अटक करण्यात आली होती. महाराष्ट्र संगठित गुन्हेगारी नियंत्रण कायदा आणि इतर कलमांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०२० पासून लकडावाला नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

हे ही वाचा : भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

मच्छरदानीसाठी दाखल केली होती याचिका

लकडवाला यानं मच्छरदानीसाठी नुकतीच कोर्टात याचिका दाखल केली होती. यात त्यानं म्हटलंय की, जेव्हा त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं तेव्हा सुरुवातीला त्याला एक मच्छरदानी देण्यात आली होती. पण कालांतरानं ती काढून घेण्यात आली. त्यामुळं मच्छरांच्या त्रासानं वैतागलेला लकडवाला गुरुवारी कोर्टात कोठडीतल्या मच्छरांनी भरलेली बाटली घेऊन पोहोचला. तसेच या मच्छारांमुळं दररोज इथल्या कैद्यांना मोठा त्रास होत असल्याचं त्यानं म्हटलं.

सुरक्षेच्या कारणासाठी मच्छरदाणी परत घेण्यात आली

दरम्यान, लकडावालाच्या याचिकेला तुरुंगाधिकाऱ्यांनी विरोध केला. विरोध करताना लकडावाला याला पुरवण्यात आलेली मच्छरदानी परत घेण्यामागील कारणंही कारागृह प्रशासनानं स्पष्ट केलं. सुरक्षेच्या कारणासाठी मच्छरदाणी त्याच्याकडून काढून घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. यानंतर कोर्टानं लकडावालाची मागणी फेटाळत ज्या कैद्यांना मच्छरचा त्रास होत आहे त्यांना ओडोमास आणि इतर मच्छर पळवण्याची औषध देण्याच्या सूचना करण्यात आलं आहे. लकडावाला याच्यासह अनेक कैद्यांनी मच्छरदानीची मागणी केली होती.

टॅग्स :Mumbai NewsDawood Ibrahim